मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितले की, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल. राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर घणाघाती आरोप केले.
विनायक राऊत यांनी इशारा देत म्हटलं की, “सिंधुदुर्गात गेल्या नऊ वर्षात सात राजकीय हत्या आणि अनेक माऱ्यामाऱ्या झाल्या. खंडण्या उकळल्या गेल्या. मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केले, हे खून कोणी पचवले, श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उद्या आम्ही भेट घेणार आहोत. त्यांना या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.”
शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात घणाघाती वाद
- भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी राणेंची केविलवाणी परिस्थिती झाली आहे. ते स्वार्थासाठी लाचारी पत्करत आहेत.
- मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केला? हे खून कोणी पचवले? श्रीधर नाईकच्या खुनात आरोपी कोण होतं? आम्हाला उघड करायला लावू नका.
- राणेंनी ट्विट करत म्हटलं, विनायक राऊत यांना मोठी बातमी देणार आहोत. राणेंनी अशी घोषणा केली होती. त्यांची पीसी झाली. पण ट्विटमधून खोदा पहाड आणि निकला कचरा अशी राणेंची अवस्था झालेली दिसली. असे विनायक राऊत म्हणाले.
- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आम्ही भेट घेणार आणि राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार.
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील खुनांबद्दल भाष्य केले होते. असे विनायक राऊत म्हणाले.
- विनायक राऊत यांनी राणेंवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते त्याचे व्हिडीओ दाखवले.