Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विमुक्त – भटके विमुक्तांसाठी केंद्राची आर्थिक सक्षमीकरण योजना, विना अडथळा नोंदणीसाठी पोर्टल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
SEED plan

मुक्तपीठ टीम

विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदायांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सक्षमीकरण योजनेचा म्हणजेच SEEDचा प्रारंभ झाला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे या योजनेची सुरुवात केली.

 

SEED योजना नेमकी कशी?

स्कीम फॉर इकॉनॉमिक एम्पारवरमेंट ऑफ डीएनटीज अर्थात सीड (SEED) योजनेचे चार प्रमख घटक आहेत:

  • शैक्षणिक सक्षमीकरण- नागरी सेवांसाठी या समुदायातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, वैद्यकीय अभियांत्रिकी, एमबीए इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश.
  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे (पीएमजेएवाय) आरोग्य विमा.
  • उत्पन्न वाढीसाठीच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन आणि गृहनिर्माण (प्रधानमंत्री आवास योजना /इंदिरा आवास योजनेद्वारे)

 

या योजनेसाठी २०२१-२२ पासून पाच वर्ष २०० कोटी रुपयांचा खर्च सुनिश्चित करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीचे काम विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध-भटके समुदायांच्या विकास आणि कल्याण मंडळाला देण्यात आले आहे.

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने विकसित केलेले ऑनलाइन पोर्टल हे या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.हे पोर्टल या समुदायांची विना अडथळा नोंदणी सुनिश्चित करेल आणि माहिती भांडार म्हणून काम करेल. हे पोर्टल वापरण्यास अतिशय सुलभ आहे आणि मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईल फोनवरदेखील सहज उपलब्ध आहे. हे पोर्टल अर्जदाराला अर्जाची प्रत्यक्ष स्थिती प्रदान करेल. लाभार्थ्यांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातील.

 

भारतातील विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध भटके समुदाय हा सर्वात वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे.अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीं प्रमाणे राज्य पाठबळापासून वंचित ठेवण्यात आले होते, असे यावेळी बोलताना डॉ.वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. “हे सरकार शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे आणि त्याला सर्वसमावेशक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार आहे, असे डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले.

 

 

यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री ए. नारायणस्वामी म्हणाले की, विमुक्त, भटके विमुक्त आणि अर्ध-भटके या जमाती हा सर्वात दुर्लक्षित, उपेक्षित आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित समुदाय आहे. त्यामुळे, या समुदायांबद्दलच्या सामूहिक विचारांमध्ये बदल घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे.


Tags: Ardh Bhatke SamudayaBhatke Vimuktacentral GovernmentEconomic Empowerment SchemeScheme for Economic Empowerment of DNTsSEED planSEED योजनाVimuktaअर्ध भटके समुदायआर्थिक सक्षमीकरण योजनाकेंद्र सरकारचांगली बातमीभटके विमुक्तमुक्तपीठविमुक्तस्कीम फॉर इकॉनॉमिक एम्पारवरमेंट ऑफ डीएनटीज
Previous Post

पहिला नैसर्गिक सॅलड बार पुण्यात, रसायनमुक्त जीवनशैलीसाठी विविध भाज्यांचे सॅलड्स!

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात २५४ जागांसाठी भरती

Next Post
nhm

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात २५४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!