मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेनामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले तसेच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची खिल्ली देखील उडवली. राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर नार्वेकरांनी ट्वीट करत राणेंच्या खिल्लीला प्रत्युत्तर दिले असून खासदार विनायक राऊत यांनी देखील राणेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
- नारायण राणे यांनी संजय राऊत हे पूर्वी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात लिखाण करत असत असा आरोप करत आम्ही शिवसेना घडवली हे नंतर आले, असा दावा केला.
- संजय राऊतांच्या सर्व भानगडी आपण बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
- संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेस एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेनेचे महत्वाचे नेते नव्हते, असं
- माध्यम प्रतिनिधीने म्हणताच नारायण राणे यांनी, “मिलिंद नार्वोकर कोण आहे? ते पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय?
- माझ्या समोरची गोष्ट आहे.
- बेल मारली की, काय आणू असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे!” अशी कुचेष्टा केली.
मिलिंद नार्वेकरांचं प्रत्युत्तर
- “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं ट्वीट करून मिलिंद नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विनायक राऊतांकडून राणेंचा समाचार
- शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेतली.
- नारायण राणेंच्या बदलत्या भूमिका दाखवत त्यांना उघडं पाडण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ या स्टाईलमध्ये नारायण राणे आणि भाजपावर जोरदार टीका केली.
- नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपामध्ये नसताना भाजपा, मोदी यांच्याविरोधात केलेले व्हिडीओ वक्तव्य मांडण्यात आले.