Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ

February 15, 2022
in करिअर, सरकारी बातम्या
0
Maharashtra University of Health Sciences 2021 exam started today

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – २०२१ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम व अंतीम वर्षाच्या परीक्षा व दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंंग, स्पीच लॅग्वेज पॅथालॉजी, ऑडिओलॉजी आदी विषयांच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहेत. 

            

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरु व कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचे मार्गदर्शन आहे. ही परीक्षा ऑफलाईन पध्दतीने व कोविड सुरक्षित वातावरणात घेण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्र व परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            

ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सदर परीक्षा राज्यातील ४० परीक्षा केंद्रांत परीक्षा घेण्यात येत अूसन या परीक्षेसाठी २३३५ विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

 

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परीधान करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनीटायझारचा वापर करण्याबाबत केंद्रप्रुखांना निर्देशित करण्यात आले आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

            

परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक, अंतर्गत दक्षता पथक, केंद्रप्रमुख, केंद्र निरिक्षक, भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) वितरीत करण्यात आली आहेत. हिवाळी -२०२१ परीक्षेसाठी प्रति परीक्षा केंद्र रुपये वीस हजार इतक्या रकमेची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे.

            

परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम, अतिविशेषोपचार व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा माहे डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा दि. २८ फेब्रुवारी ते दि. २१ मार्च २०२२ कालावधीत घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा राज्यातील १८४परीक्षां केद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी ८३९४८ इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

            

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने वेळापत्रकानुसार होणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.


Tags: MaharashtraMaharashtra University of Health Sciencesमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
Previous Post

वाझेच्या चौकशीची सीबीआयला परवानगी, जबानी बदललेल्या वाझेमुळे आता आघाडी नेत्यांपर्यंत तपास जाणार?

Next Post

“जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!”

Next Post
t raja Singh

"जे मतदार भाजपाला मत देणार नाहीत त्यांच्यासाठी योगींनी हजारो बुलडोझर मागवलेत!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!