मुक्तपीठ टीम
हरे रामा हरे कृष्णाच्या पवित्र घोषानं निनादणारा आसमंत. या पवित्र वातावरणातच पर्यावरणाशी मेळ घालत एक आदर्श जीवनशैलीचं आचरण करणारं गोवर्धन इको व्हिलेज. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पूर गावाजवळ वसलेलं हे इको व्हिलेज म्हणजे शेती आणि पूरक उद्योगांचं केंद्रही. या पर्यावरण प्रेमी प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रगतशील शेतीचे उपक्रम राबवले जातात. या प्रकल्पातच काम करणारे अमूल्य हे शेतकरी मूळचे ओडिशातील. त्यांनी आपुलकीनं ताग लागवडीच्या प्रयोगाची माहिती दिलीय.
अशी असते तागाची प्रक्रिया
ही शेती तागाची आहे. ओडीशामध्ये उडीया भाषेत याला छनी असे बोलले जाते. याचे फळ असते त्याचे बीज काढतात आणि नंतर ते बीज विकण्यासाठी किंवा दुसऱ्यांदा शेती करताना त्याचा वापर केला जातो. नंतर याचे लाकूड मजबूत होते,मजबूत झाल्यानंतर ते लाकूड पाण्यामध्ये सडवले जाते. पुढे सडवल्यानंतर त्याचा जो ज्यूट निघतो तो रस्सी बनवण्यासाठी कामाला येतो.हे ताग तयार होण्यासाठी कमीत कमी दीड-दोन महिने लागतात.
पाण्याचा वापर कसा केला जातो?
पाण्याचा वापर हा शेतीवर अवलंबून असतो. जर डोंगराळ भागात शेती करायची असेल तर तेव्हा ते शेत सुकलं जावू नये यासाठी दर आठवड्याला पाणी दिली जातेय किंवा एखाच्या सामान्य ठिकाणी शेती केली तर तिथे पाणी कमी लागते. ओडीशामध्ये उगवल्यापासून ते शेवटपर्यंत दोन तीन वेळा पानी द्यावे लागते.
ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. पुढे ज्यूटचा वापर बॅग बनवण्यासाठी केला जातो. ज्यूटपासून पाइल,लंगर चालवण्यासाठी ज्या रस्सी वैगेरे बनवले जातात ते याच्याच बनतात.
ताग म्हणजे काय?
- ताग म्हणजेच इंग्रजीत ज्यूट म्हणून ओळखली जाणारी ही एक वनस्पती आहे.
- या वनस्पतीच्या ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू मिळतात.
- त्या तंतूंपासून वनस्पतीजन्य धागेनिर्मिती करता येते, हे एक हरित तंत्रज्ञान आहे.
- बंगालात भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात.
- या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी
- नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणार्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.
वनस्पतीपासून धागे कसे बनवतात?
सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात.
या क्रियेत घायपात, अंबाडी, ताग या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते. ते सुकल्यानंतर त्यांचे गठ्ठे बांधून ताग गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. रेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचिक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात.
गोण्या, पिशव्यामुळे ताग प्रत्येकाच्या वापरात, पण नाव नसेल माहित!
तागाच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून गोण्या, शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात.
हेही वाचा:
https://muktpeeth.com/what-is-jute-means-taag-in-marathi/
हेही वाचा:
काशी विश्वनाथ मंदिरात सुरक्षा रक्षकांची ‘अनवाणी’ ड्युटी संपली! पंतप्रधान मोदींनी पाठवले तागाचे बूट!
पाहा व्हिडीओ: