मुक्तपीठ टीम
राहुल बजाज हे उद्योगपती. पण अनेकदा व्यावसायिक व्यावसायिक हानीचा विचार करून सत्ताधाऱ्यांशी जुळवून राहतात, तसे त्यांचे नव्हते. ते बेधडक आपली भूमिका मांडायचे. मग ते काँग्रेस सत्ताकाळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना परवाना राजवरून ठणकावणे असो किंवा सध्याच्या भाजपा सत्ताकाळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सध्या प्रश्न विचारायला भीती का वाटते, असा रोखठोक प्रश्न विचारणे असो! त्यामुळेच उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलेले कण्याविषयीचे ट्वीट चर्चेत आहे.
We shall miss the ONLY businessman with this X-Ray! pic.twitter.com/Cfdew5RBXn
— Harsh Goenka (@hvgoenka) February 12, 2022
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले, प्रश्न विचारायला का वाटते भीती?
- जे धाडस त्यांनी इंदिरा गांधी सर्वशक्तिमान असताना त्यांना ठणकावून सांगत दाखवले, तेच आताच्या भाजपा सत्ताकाळातही दाखवले.
- २०२१च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील एका कार्यक्रमातही राहुल बजाज यांचे वय झाले असले तरी कणा तसाच ताठ असल्याचे दिसले.
- त्यांनी गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर मोदी सरकारला प्रश्न विचारला.
- “आपल्या मनात भीतीचे वातावरण नक्कीच आहे, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
- त्यानंतर राहुल बजाज म्हणाले, “सरकार चांगले काम करत आहे आणि असे असूनही तुम्ही आमच्या टीकेला स्वीकाराल यावर आम्हाला विश्वास नाही.”
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे प्रश्न विचारायला भीती वाटत नाही, असे उत्तर देताच, त्यालाही त्यांनी दाद दिली.