मुक्तपीठ टीम
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये फिल्ड अटेंडंट (ट्रेनी), मेकॅनिकल मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनी, इलेक्ट्रिशियन मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनी, एमसीओ ग्रेड-३ ट्रेनी, एचईएम मेकॅनिक ग्रेड-३ ट्रेनी, इलेक्ट्रिशियन ग्रेड-३ ट्रेनी, ब्लास्टर ग्रेड-३ ट्रेनी, क्यूसीए ग्रेड ३ ट्रेनी या पदांसाठी अशा एकूण २०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०२ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ०५ ते ०८वी किंवा आयटीआय
- पद क्र.२- आयटीआय (वेल्डिंग/ फिटर/ मशीनिस्ट/ मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ ऑटो इलेक्ट्रिशियन)
- पद क्र.३- आयटीआय (इलेक्ट्रिकल)
- पद क्र.४- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.५- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.६- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ब्लास्टर/ माइनिंग मेट प्रमाणपत्र ३) प्रथमोपचार प्रमाणपत्र
- पद क्र.८- १) बी.एससी (केमिस्ट्री/ जियोलोजी) २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmdc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.