मुक्तपीठ टीम
कोरोनाची स्थिती आता आटोक्यात येताना दिसत आहे. यामुळेच अॅमेझॉन कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने दोन्ही लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मास्कविना काम करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात ज्या देशांमध्ये मास्कमुक्ती जाहीर झाली असेल त्या देशांमधील अॅमेझॉन शाखांमध्येच ही मास्कमुक्ती शक्य असेल.
अॅमेझॉनने जारी केलेल्या निर्देशात असेही म्हटले आहे की, जर कर्मचाऱ्यांना भरपगारी कोरोना रजा हवी असेल तर त्यांनी १८ मार्चपर्यंत संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे. अॅमेझॉनने अमेरिकेतील गोदाम आणि वाहतूक कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सूचना दिली आहे. अमेरिकेत कमी होत असलेले कोरोनाचे रुग्ण, वाढते लसीकरण, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि सरकारी आरोग्य अधिकाऱ्यांचे मत लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, हे एक चांगले चिन्ह आहे आणि यासह आम्ही सामान्य व्यवसायाकडे वाटचाल करत आहोत.
अॅमेझॉन अमेरिकेतील रोजगार देणारी दुसरी मोठी कंपनी!
१. अॅमेझॉन ही अमेरिकेमधील रोजगार देणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
अमेझॉनवर कोरोना काळात कोरोना सुरक्षा नियमांबद्दल टीका होत आहे.
२. कंपनी सुरक्षेची काळजी घेत नसल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला होता.
४. कंपनीचे जगभरात १६ लाखांहून अधिक पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी आहेत.