मुक्तपीठ टीम
एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जाँटी प्लस लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हाय परफॉर्मेंस मोटरसह ६० व्ही/४० एएच लिथियम बॅटरीची क्षमता आहे. यासोबतच यात क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म आणि मजबूत चेसिस आहेत. यासोबतच टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स आणि इंजिन किल स्विचसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगविषयीचे फिचर्स
- नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डीसी मोटरची क्षमता आहे, जी स्कूटरला जलद चार्जिंग सुविधा देते.
- ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतात.
- या ईव्हीमध्ये फिक्स्ड आणि पोर्टेबल अशा दोन्ही प्रकारच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल.
- जाँटी प्लस ई-स्कूटरमध्ये युजर्ससाठी मोबाईल यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहे.
जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची स्पेशालिटी आणि किंमत
- या ई-स्कूटरची किंमत १ लाख, १० हजार, ४६० रुपये (एक्स-शोरूम) असेल.
- कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर १२० किमीपेक्षा जास्त रेंज देईल आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास घेईल.
- एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले की, भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत जाँटी प्लस सादर करताना ब्रँडला आनंद होत आहे.
- स्टायलिश डिझाईन, डिजिटल डिस्प्ले आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षा फिचर्स असलेले जाँटी हे उत्कृष्ट इलेक्ट्रिक बाईकच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी उत्तम पॅकेज आहे.