मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाची तिसरी लाटही ओसरल्याचे चित्र दिसत आहे, पण या कोरोना काळात देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होता. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले. मोफत तिकीट दिले गेले. देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या
- काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना ही वैश्विक महामारी होती.
- पण, त्याचेही राजकारण केले गेले.
- हे मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले आहे का?
- मी कोणाचेही नाव घेतले नाही.
- कोणतीही टोपी घालायची काय गरज आहे?
- पण तुम्ही जर आधीच उभे राहिले आहात तर मी नाव घेऊन बोलेन.
- या कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडल्या आहेत.
- WHO जगभरातील देशांना सल्ला देत असताना पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे नियम पाळत होता.
- सर्व आरोग्य तज्ञ सांगत होते की ते जिथे आहेत तिथेच राहा.
- हा संदेश जगभर देण्यात आला.
- कारण, ती व्यक्ती संक्रमित असेल तर कोरोना तिथे घेऊन जाईल ही भीती होती.
‘मोफत तिकीट वाटून मजुरांना साथीच्या आजारात ढकलले’
- पुढे ते म्हणाले, काँग्रेसने मुंबईत काय केले?
- मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले.
- मोफत तिकीट दिले गेले.
- तुम्ही जेथले आहेत तिथे जा.
- बिहारमधील आहात तर तिथे जा, युपीमधील आहेत तर तिथे जा, असे सांगण्यात आले.
- येथील श्रमिकांना त्यांनी अनेक संकटात लोटले.
- प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
- तुम्ही आमच्या कष्टकरी बांधवांना अनेक संकटात ढकलले आहे.’
दिल्ली सरकारवरही मोदी आक्रमक
- दिल्ली सरकारनेही माईक घेऊन ठिकठिकाणी सांगितले की गावी जा, कोरोना आहे.
- दिल्लीमधून बसने सोडण्यात आले पण ते ही अर्ध्या रस्त्यात.
- त्यामुळे या श्रमिकांवर अनेक संकटे आली.
- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाची लाट नव्हती, तीव्रता नव्हती.
- मात्र या कारणामुळे त्या राज्यांनाही कोरोनाचा विळखा बसला.
- हे कसले राजकारण आहे? संकटाच्यावेळीही यांना मानवता दिसली नाही? उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्राचे सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप मोदी यांनी केला.