मुक्तपीठ टीम
लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी शाहरुख खान याने दुआ मागितली, त्यावेळी त्याने मास्क खाली केला आणि फुंकर मारली. शाहरुख खानच्या या कृतीमुळे थुंकल्याचं सांगत काहींनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेनेचे दोन नेते त्याच्यासाठी सरसावले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रोलर्सला लाज नाही- संजय राऊत
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला.
- हे कोण लोक आहेत.
- त्यांना थोडीही लाज नाही.
- अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे.
- ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे.
- शाहरुख दुआ मागत होता.
- एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत.
- हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे.
- एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात.
- धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही?
- तुम्ही देशाची वाट लावली आहे.
थुंकणे नाही, त्याला दुवा फुंकणे म्हणतात… उर्मिला मातोंड
- याला थुंकणे नाही, त्याला दुवा फुंकणे म्हणतात.
- या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात.
- पंतप्रधानांचे फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे होते.
- भारत मातेच्या अनमोल लेकीचं गाणे ऐका
- “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान”
- (आजचा दिवस तरी सोडा)
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें🙏🏻) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022
क्या इसने थूका है ❓ pic.twitter.com/RZOa2NVM5I
— Arun Yadav (@beingarun28) February 6, 2022