मुक्तपीठ टीम
२०२० मध्ये १०० नंबरवर जवळजवळ ६.९ लाख फोन कॉल केले गेले. यामध्ये फक्त ३८% कॉलरनीच पोलिसांकडून मदत मागितली. कोरोना महामारीच्या काळात १०० नंबरवर केले गेलेले ४५% फोन कॉल पोलिसांशी संबंधीत नव्हते.
१७% लोकांनी फक्त माहिती मिळवण्यासाठी फोन केला होता. हेल्पलाईन ऑपरेटरला त्रास देण्यासाठी काही कॉल केले गेले. या कॉलपैकी अनेक कॉल हे पोलीस स्टेशनसोबत काहीच संबंध नसलेले होते.
एका आयपीएस ऑफिसरने सांगितले, “आम्हाला असे कॉल येतात जे चुकून लावले जातात तर, काही वयोवृद्ध एकटे असल्यामुळे बोलण्यासाठी फोन कॉल करतात. यात प्रॅंक कॉलचा देखील समावेश आहे ज्यांना असे वाटते की, आपण कधीच पकडले जाणार नाही. आम्ही असे नंबर शोधून काढत आहोत ज्यांनी त्रास देण्यासाठी पुन्हा पुन्हा कॉल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर, कायदेशीर कारवाई केली जाईल.”
हेल्प लाईन नंबरवरुन सोडवलेली प्रकरणे
कोरोना महामारीच्या काळात मानवी तस्करीच्या घटना घडल्या. एजंट्सवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने काही कॉल केले गेले. १० ऑक्टोबर रोजी बंगाली बोलणार्या एका महिलेने हेल्पलाईन नंबरवर कॉल केला होता. ती बंगाली भाषेत बोलत असल्याने फोन ऑपरेटरला तिची भाषा कळली नाही. पण, दोघांनी तिचा फोन ऐकला. काही बंगाली शब्दांवरुन ऑपरेटरनी महिलेचे बोलणे समजून घेतले. ओळखले की, ती महिला आणि आणखी दोन महिला एका खोलीत बंदिस्त आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकीऱ्यांना माहिती दिली आणि कॉलचे स्थान ट्रॅक केले. ती महिला ठाणे येथील मानपाडा येथे कैद होती. अधिकीऱ्यांनी ठाणे पोलिसांना माहिती दिली ती बांगलादेशी असल्याचे समजले. त्या तिन्ही महिलांची सुटका करण्यात आली आणि एका आरोपीला अटक करण्यात आले.
१३ डिसेंबरला हेल्पलाइन क्रमांकावर एका मुंबईकर माणसाचा फोन आला. त्याने सांगितले माझा मित्र ट्रेकिंगला गेला आहे, आणि तीथे एका पॉइंटवर अडकला आहे. त्याला कोणाकडून मदत घ्यावी हे कळत नाही आहे. त्यानंतर आम्ही हिमाचलप्रदेशमधील कंट्रोलरुमसोबत संवाद साधला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा मित्र जेथे अडकला आहे तो भाग चांबा पोलीस स्टेशन अंतर्गत येतो हे कळले आणि मग त्या पद्धतीने पुढील वाटचाल केली गेली. अशा पद्धतीने हेल्पलाइनने हिमाचलप्रदेशमध्ये बर्फात अडकलेल्या एका माणसाला देखील वाचवले.