पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील उर्से हे गाव गणेशोत्सवासाठी वेगळं गाव म्हणून ओळखलं जातं. भाद्रपदातील गणेशोत्सवात गावात एकच गणपती बसवण्याची परंपरा आहे. माघी गणेशोत्सवात मात्र संतोष पाटील यांच्यासारखे गावकऱ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन होतं. याही वेळी पाटलांच्या घरी शुक्रवारी सकाळी बाप्पा विराजमान झाले. पाहुण्यांनी घर भरून गेलं. शनिवारी संध्याकाळी पारंपरिक पद्धतीन गावातील गणेशभक्तांनी पाटील कुटुंबियांसह बाप्पाला निरोप दिला. बाप्पाच्या जयजयकाराच्या घोषणांनी गाव ते नदी अंतर पार पडलं तरीही प्रत्येकाच्या मनात अवघ्या दीड दिवसातच बाप्पा गावाला चालल्याची हुरहुर होतीच…