Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

जिद्दीनं प्रतिकुलतेवर मात, कुस्तीचं मैदान गाजवतेय ऊसतोड कामगाराची लेक

February 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Pallavi khedkar wrestling Journey

मुक्तपीठ टीम

कुस्तीची कसलीही पार्श्वभूमी नसलेले कुटुंब. ऊसतोड कामगार असलेले आई- वडिल. खेळांसंबधित जास्त काही माहिती तर सोडाच पण सुविधाही नसलेला परिसर. अशा अडथळ्यांवर मात करत कुस्तीपटू पल्लवी खेडकरनं प्रशिक्षण आणि स्पर्धांमधील यशापर्यंतचा प्रवास करत आहे. त्यासाठी कामी येत आहे, तिचं खडतर परिश्रम, जिद्द आणि कर्तृत्व.

 

मूळ पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावच्या पल्लवीच्या घराची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीची. तिचे आई-वडिल हे ऊस तोडणीचे काम करतात. अशा परिस्थितीत ही मुलीला उच्च शिक्षण देण्याचा व कुस्तीत तिला प्रोत्साहन देण्याचे काम पल्लवीचे आई वडील करीत आहेत. पल्लवीला लहानपणापासून शाळेची गोडी होती. कुटुंबात तिला हुशार म्हणून पाहिलं जायचं. पहिली ते चौथी पर्यंतचे तिचे शिक्षण जिल्हा परिषद हनुमान वस्ती येथे झालं. पल्लवीला वाचनाची, पोहोण्याची आणि बाईक रांईडिगची आवड आहे. पल्लवीने सातवीत असताना कब्बडी खेळायला सुरुवात केली आणि तिला त्यात यशही मिळालं. पल्लवीला भाऊ आणि बहिण आहे. छोट्या बहिणाला किडणीचा त्रास आहे. तिच्या औषधांचा खर्च आणि पल्लवीच्या खेळाचा खर्च असताना ही तिच्या आई वडिलांनी तिला शिकवलं. तिच्यावर विश्वास ठेवला.

 

कबड्डी या खेळाने सुरुवात करून नंतर शिक्षकांच्या सल्ल्यानुसार कुस्ती या क्रीडाप्रकाराकडे ती वळली. पल्लवी कुस्ती खेळू लागल्यावर अनेकांनी तिच्या कुटुंबाना नावं ठेवली. पण तरीही तिने त्यांच्याकडे लक्ष न देता ती कुस्तीत प्रावीण्य मिळवण्यासाठी परिश्रम घेत आहे. तिच्या मेहनतीने ती कुस्तीमध्ये नाव कमावू लागली. नववीला आल्यानंतर एमपी नॅशनल मध्ये तिला सुवर्णपदक मिळालं. मुलीला मिळालेल्या यशामुळे आई-वडिलांनी तिला बाहेर पाठवायचा विचार केला, पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना ते शक्य नव्हतं. पण गावकऱ्यांनी आणि आमदार मोनिका राजे यांनी तिला मदत करत ५००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. नंतर तिला कोल्हापूरला संदीप सरांकडे सरावासाठी पाठवलं. अकारावीला खेलो इंडियामध्ये तिची निवड झाली.

 

पल्लवी यापूर्वी इयत्ता ९ व १० वी मध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा अनेक कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बारामती येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत पल्लवीने ६८ किलो वजन गटात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकविल्याने तिची हरियाणा येथे होणाऱ्या अंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती (मुली) स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

 

पल्लवी खेडकर ही अगदी मेहनतीने आणि चिकाटीने कुस्तीत आपलं यश संपादन करत आहे. ती ज्या कोचकडे प्रशिक्षण घेत आहे, ते या स्तरावर ठीक आहे. पुढे जाऊन उच्च दर्जाचे प्रशिक्षण तिला घ्यावे लागणार आहे. सध्या तिला तिच्या आहाराबाबत (Diet) जास्त समस्या असून त्याचा खर्च तिच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे कृपया आपण शक्य असेल तशी तिला नक्की मदत करावी:

 

कु.पल्लवी रामभाऊ खेडकर
मो.9373313804
श्री. रामभाऊ विठ्ठल खेडकर
मो.9021046439
बँक A/c 3286239155 IFSC: CBINO282001 सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खरवंडी कासार
गुगल पे.9373313804
फोन पे.9373313804

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: GoodNewsPallavi khedkarPathardiकुस्तीचांगली बातमीपल्लवी खेडकरपाथर्डी
Previous Post

राज्यात १५ हजार२५२ नवे रुग्ण, दुपटीने ३० हजार २३५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये टाटा कर्करोग रुग्णालय उभारले जाणार

Next Post
Tata Memorial Hospital

रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये टाटा कर्करोग रुग्णालय उभारले जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!