Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“२ कोटी रोजगाराच्या जुमल्यानंतर ६० लाख नोकऱ्यांचा नवा जुमला!” : सचिन सावंत

गिफ्ट सिटीतील सवलतींची खैरातीतून भाजपाने महाराष्ट्राचे केलेले नुकसान अधोरेखित

February 3, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
sachin sawant

मुक्तपीठ टीम

केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील तरुणवर्गाची घोर निराशा केली आहे. प्रत्येक वर्षी २ कोटी  रोजगाराच्या जुमल्यानंतर ६० लाख नोकऱ्या हा ही एक नवा जुमलाच आहे. देशातील असलेले रोजगार घटत असल्याचे चित्र असताना ६० लाख नवीन रोजगार काय आकाशातून पडणार का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

 

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, २०१६ ला “मेक इन इंडिया” योजना आणली तेव्हा उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मध्ये १६% वाटा होता. २०२२ पर्यंत हा वाटा जीडीपीच्या २५% पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले होते. २०१९ ला जागतिक बँक अहवालानुसार हा वाटा १३.६% पर्यंत खाली आला. यावर्षीही तो खाली आहे. गेल्या ५ वर्षांत उत्पादन क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या रोजगारांत सातत्याने घट झाली. २०१६-१७ मध्ये ५.१० कोटी रोजगार या क्षेत्रात होते. २०२०-२१ पर्यंत ते २.७३ कोटीच राहीले. या क्षेत्राने ४६% म्हणजे २.३७ कोटी असलेले रोजगार गमावले मग आता ६० लाख नवीन रोजगार काय आकाशातून पडणार का?

 

८ वर्षे मोदी सरकारने विष:काल दाखवला आता अमृतकालाची स्वप्ने दाखवत आहेत. २५ वर्षांच्या अमृतकालाचा जुमला देण्याआधी २०२२ पर्यंत न्यू इंडिया आणणार होते त्याचे काय झाले? सर्वांना घरे दिली का? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले का? शिक्षणात नोंदणी प्रमाण ३५% केले का? हाताने मैला उचलणं बंद झाले का? शहरातील प्रदुषण संपले का? आणि कुपोषण कमी झाले का? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.

मोदी सरकारने बजेटमध्ये गुजरातच्या गिफ्ट सिटी मधील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात सीमापार विवाद निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र, परदेशी विद्यापीठे, जहाज भाड्याने देणे व वित्त पुरवठ्यासाठी कर सूट , आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावर ऑफशोअर फंड व्यवस्थापन तसेच ऑफशोअर बँकिंगसाठी कर सूट जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत असते तर महाराष्ट्राचा खूप लाभ झाला असता.भाजपा नेत्यांनी व फडणवीस सरकारने मोदींच्या इच्छेनुसार महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान केले आहे. मुंबईत होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये मोदी सरकार पळवत असताना हे केवळ गप्प बसले नाहीत तर महाराष्ट्राच्या जनतेला फसवत राहीले असा आरोपही सावंत यांनी केला. महाराष्ट्राची जनता भाजपा नेत्यांना माफ करणार नाही असेही सावंत म्हणाले


Tags: INCMaharashtrasachin sawantUnion Budget 2022अर्थसंकल्पकाँग्रेससचिन सावंत
Previous Post

“बहुआयामी कार्यकर्ता अरुण कापटे”

Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा!

Next Post
10 12 offline exams

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!