Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबड येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करावे

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रकल्पाचे काम गतीने करण्याच्या पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना

February 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Chhagan Bhujbal

मुक्तपीठ टीम

अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत नाशिक येथे होणारा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासंदर्भातील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोदावरी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रकल्पाचे काम गतीने सुरू व्हावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्वसामान्यांचे हित लक्षात घेवून या कामाला तात्काळ सुरूवात करावी असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

 

मंत्रालयातील दालनात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न, नागरी पुरवठा, व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत येथे सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी  अजित पाटील, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, सहसचिव संजय देगावकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ.अमर सुपाते, मुख्याधिकारी एस.आर.तुपे यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

उद्योगमंत्री श्री.देसाई म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, नाशिक येथे होणाऱ्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत वैज्ञानिक अधिकारी डॉ.सुपाते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकल्पाबाबत अनुकूल अहवाल दिला आहे. या अहवालातील सूचना लक्षात घेवून औद्योगिक विकास महामंडळाने त्याप्रमाणे कार्यवाही करावी.कोणत्याही प्रकारे या कामात दिरंगाई न करता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी श्री.देसाई यांनी दिल्या.

 

प्रकल्प पूर्ण करताना समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

अन्न, नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले, अंबड महाराष्ट्र औद्योगिक वसाहत, नाशिक येथे होणाऱ्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम होताना नदीतील पाण्याचे प्रदूषण होता कामा नये. तसेच नदीच्या पाण्याची शुध्दता रहावी यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कारण हा प्रश्न लोकाच्या आरोग्याशी संबधित आहे.हा प्रकल्प राबविणाऱ्या यंत्रणांनी कामाला प्राधान्य द्यावे दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण करताना वैज्ञानिक अधिकारी डॉ.सुपाते यांच्या समितीने दिलेल्या सूचनांचेही पालन केले जावे, अशा सूचना यावेळी श्री.भुजबळ यांनी दिल्या.


Tags: AmbadCivil Supplies and Consumer Protection Chhagan Bhujbalcommon wastewater treatmentGodavari PollutionGuardian Minister Chhagan BhujbalMinister for FoodmuktpeethSewage Projectअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळअंबडगोदावरी प्रदूषणपालक मंत्री छगन भुजबळमुक्तपीठसांडपाणी प्रकल्पसामाईक सांडपाणी प्रक्रिया
Previous Post

यूपीच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा उल्लेख का?

Next Post

सायकलीला हाताचा आधार! अखिलेश यादवांविरोधात काँग्रेसचा उमेदवार नसणार!!

Next Post
up election

सायकलीला हाताचा आधार! अखिलेश यादवांविरोधात काँग्रेसचा उमेदवार नसणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!