मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी हे कधी १२ आमदारांची कधी यादी थांबवतात तर कधी भाजपाच्या मागण्यांसाठी सत्तेतील आघाडी सरकारला जाब विचारतात. पण बंगालमध्ये राज्यपालांचे वास्तव पाहता आघाडी सरकारला आपले राज्यपाल बरे असे वाटेल, कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखर यांना ट्वीटरवर ब्लॉक केलं आहे. त्याची माहिती स्वत: ममता बँनर्जी यांनी दिली आहे. अर्थात राज्यपालही गप्प बसले नाही. त्यांनीही उत्तर दिलं आहे.
ममता यांनी ब्लॉक केल्यावर राज्यपाल धनखर यांचे ट्वीट
- ममता बॅनर्जी यांनी ब्लॉक केल्यानंतर राज्यपाल धनखर यांचे एक ट्विट समोर आले आहे.
- या ट्विटमध्ये त्यांनी आज सकाळी १०.२५ वाजता व्हॉट्सअॅपवरून ममता बॅनर्जी यांना पाठवलेला संदेश शेअर केला आहे.
- राज्यपालांनी शेअर केलेल्या संदेशात असे लिहिले आहे की, ‘संविधानिक कार्यकर्त्यांमधील संवाद आणि सामंजस्य हे लोकशाहीचे सार आणि आत्मा आहे आणि तो संविधानाचा आदेश आहे.
- परस्पर आदर आणि संबंधाने हे आणखी सुधारले जाऊ शकते.
- मला तुमच्याबद्दल नेहमीच वैयक्तिक आदर आहे.
- मला खात्री आहे की तुम्ही यावर गांभीर्याने विचार कराल.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
- मला क्षमा करा पण माझा नाईलाज झाला आहे.
- ते (राज्यपाल) दररोज माझ्याविरुद्ध आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध चुकीच्या कमेंट करत आहेत.
- त्यांचे वागणे असंवैधानिक आहे.
- नैतिकता जराही उरलेली नाही.
- सरकारला रोज सल्ले आणि निर्देश दिले जात आहेत.
- हे लोकांनी निवडणूक दिलेलं सरकार असताना एखाद्या मजुरासारखी वागणूक दिली जात आहे.
- हा सगळा प्रकार चीड आणणारा आणि अस्वस्थ करणारा असून त्यासाठीच मी ट्वीटरवर त्यांना ब्लॉक केले आहे.
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की राज्यपाल घटनाबाह्य कामे करत आहेत.
- राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना त्यांनी अनेकवेळा धमकावले आहे.
- याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला.
- धनखड यांना येथून हटवण्याची मागणी केली मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, असे ममता म्हणाल्या.
राज्यपालांचे ते ट्वीट झोंबल म्हणून ममतांनी केलं ब्लॉक
- राज्यपालांनी रविवारी ट्वीट केलं.
- ‘पश्चिम बंगालची पवित्र भूमी रक्ताने माखली आहे.
- मानवाधिकार पायदळी तुडवले जात आहेत.
- लोकशाहीचा गॅस चेंबर म्हणता येईल अशी स्थिती राज्यात आहे.
- येथे कायद्याचे राज्य उरलेले नाही.
- हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे.
- अशावेळी संविधानाचे रक्षण करणे ही राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे आणि कुणी मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरीही मी माझे कर्तव्य निभावणार आहे.
- त्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही.
- राज्यपालांचं हेच ट्वीट ममता बॅनर्जी यांना झोबलं असून त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ममतांनी राज्यपालांना ट्वीटरवर थेट ब्लॉक केले आहे.