Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निदर्शने, मुंबईतील धारावीतही वर्षा गायकवाडांच्या घरासमोर आंदोलन!

January 31, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Agitation Outside Varsha Gaikwad House

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे.

 

यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यायची विद्यार्थ्यांची मागणी

  • शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा ऑफलाईन घेण्याचं जाहीर केल्यानंतर सोशल मीडियाव विद्यार्थ्यांकडून या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
  • शाळा ऑनलाईन असताना, परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल आंदोलक विद्यार्थांकडून केला जात आहे.
  • दरम्यान, ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आक्रमकपणे उतरले असून, बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
  • धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी जमलेले आहेत.
  • यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.

 

पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

  • सुरूवातील विद्यार्थ्यांना समजावण्याच प्रयत्न केला मात्र आक्रमक विद्यार्थी काही केल्या ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.
  • यावेळी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.
  • पोलिसांच्या लाठीमारानंतर विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा संपूर्ण परिसराचा चार्ज घेतला होता.
  • त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजपाटा बोलवला.

 

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत– वर्षा गायकवाड

  • परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत.
  • संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही.
  • काही गोष्टी बोलायच्या असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात.
  • आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.
  • त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू.
  • विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.

Tags: dharavimumbaiOffline Examsonline examsvarsha gaikwadऑनलाईन परीक्षाधारावीमुंबई
Previous Post

अर्थसंकल्पापूर्वीचा आर्थिक पाहणी अहवाल असतो तरी काय?

Next Post

सांगलीत ‘पुष्पा’! रक्तचंदनाची तस्करी करणारी टोळी जेरबंद! अडीच कोटीचा माल जप्त!

Next Post
pushpa gang red sandlewood smuggling busted in sangli

सांगलीत 'पुष्पा'! रक्तचंदनाची तस्करी करणारी टोळी जेरबंद! अडीच कोटीचा माल जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!