मुक्तपीठ टीम
आमची एखादी वायनरी असेल तर किरीट सोमय्यांनी ताब्यात घेऊन ती स्वत: चालवावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या वाइन व्यवसायातील भागिदारीच्या आरोपाला उत्तर देताना दिली आहे. तसेच भाजपा नेते आमच्या मुलांपर्यंत जातात, म्हणून विचारतो, किरीट सोमय्यांची पोरं काय चणे-शेंगदाणे विकतात का ? अमित शहांची पोरं केळी, ढोकळे विकतात का ? तुमची मुलं काय करतात आधी ते पाहा, आमची मुले ड्रगच्या आहारी गेलेलीत नाही, घेत नाहीत. तसेच फडणवीसांची मुले डांसबार टाकणार आहेत का? नाचवणार आहेत का, अशा प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊतांना शरद पवारांचा फोन
- भाजपाची थोतांडी लोक काय म्हणतात…
- भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरु केलं आहे, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही.
- मला शरद पवारांचाही फोन होता, हसत होते ते!
- अशोक गर्ग माझे मित्र आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का?
- एखाद्या कुटुंबातील कुणी एखादा व्यवसाय करत असेल तर गुन्हा आहे का?
- असेल कुणाची भागिदारी, तर सरकारने घेतलेले धोरण त्या व्यक्तीसाठी आहे का?
भाजपा नेत्यांची मुलं काय करतात?
- कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
- बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा काम करणं, कष्ट करणं कधीही चांगलं.
- भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?
- अमित शहांचा मुलगा केळी विकतो, सफरचंद विकतो, ढोकळा विकतो का?
- सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का?
- फडणवीसांची काय किंवा भाजपाच्या नेत्यांची मुलं वांद्र्याच्या पेडररोडच्या रस्त्यावर स्टॉल टाकणार आहेत का?
- डांसबार टाकणार आहेत का, नाचवायला!
तुमची मुलं काय करतात ते पाहा…
- तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जात आहात, हे राजकारण तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही.
- तुमची मुलं काय करतात ते पाहा.
- आमची मुलं ड्रगच्या आहारी गेलेली नाहीत.
- आमची मुलं ड्रग विकत नाहीत.
- भाजपाच्या किती नेत्यांचे साखर कारखाने, वाइनरीज आहेत, ते पाहा.