मुक्तपीठ टीम
जगातील अब्जावधींच्या आवडता फेसबुक आता जगातील सर्वात वेगवान असा आर्टिफिशियल इंटलिजन्स म्हणजे एआय सुपर कॉम्प्युटरचा वापर करणार आहे. त्यामुळे द्वेषयुक्त भाषणांसारख्या विषारी कन्टेंटवर लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे की, हा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे, जो पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या मध्यापर्यंत लाँच केला जाऊ शकतो. त्याचवेळी कंपनीकडून त्याची किंमतही जाहीर केली जाऊ शकते.
झुकेरबर्ग यांनी केली घोषणा
- फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल माहिती दिली.
- मेटाने एआय रिसर्च सुपरक्लस्टर म्हणजेच आरएससी संगणक तयार केला आहे.
- तो २०२२ च्या मध्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतो.
- त्या वेळी तो जगातील सर्वात वेगवान एआय सुपर कॉम्प्युटर असेल.
- त्याला बनवण्यासाठी किती खर्च आला याची माहिती सध्या कंपनीने दिलेली नाही.
- मार्क झुकबर्गनी त्याला एआय रिसर्च सुपरक्लस्टर असे नाव दिले.
आरएससी सुपर कॉम्प्युटरचे खास फिचर्स
- आतापर्यंतचे एआय सुपर कॉम्प्युटर बनवले गेले आहेत, ते अनेक भाषांचे भाषांतर करण्याचे काम करतात.
- एआय आधारित सुपर कॉम्प्युटरमध्ये धोकादायक कंटेंट ओळखण्याची क्षमता असल्याचीही माहिती मिळाली आहे.
- हा नेक्स्ट जनरेशन एआय सुपर कॉम्प्युटर ही सर्व कामे अतिशय वेगाने करेल.
- सुपर कॉम्प्युटरमध्ये २०२२ वर्षात १६ हजार जीपीयू असणार.
- सुपर कॉम्प्युटर सामान्य कॉम्प्युटरपेक्षा कितीतरी पटीने वेगवान असेल आणि सहजपणे कॅल्क्युलेशन करू शकेल.
- फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण थांबवण्यासाठी देखील या सुपर कॉम्प्युटरचा वापर करेल.