मुक्तपीठ टीम
ऑस्टेलियातील कसोटी मालिकेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आज भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला कसोटी सामन्याला चेन्नईतील एमए चिदंबरम मैदावावर सुरूवात झाली. पहिल्या कसोटीतील पहिला दिवस इंग्लडने गाजवला. १००वी कसोटी खेळणाऱ्या कर्णधार जो रुटने शतक झळकवले. रुट १२८ धावांवर बाद झाला. पहिला दिवशी इंग्लंडने ३ बाद २६३ धावा करत खेळावर पूर्ण वर्चस्व मिळवले.
Some things are just meant to be… 💯
Scorecard: https://t.co/gEBlUSOuYe#R100T | #INDvENG pic.twitter.com/hExB0VwuMB
— England Cricket (@englandcricket) February 5, 2021
वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढविताना रॉरी बर्न्स बाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या. तर बुमराने डॉनियल लॉरेन्सला शून्यावर बाद केले. त्याच्या जागी जो रुट आला. रुटने पुढील खेळाची धुरा हाती घेत सिबली सोबत तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली.
Greatness recognised 👏
Scorecard: https://t.co/gEBlUSOuYe#INDvENG pic.twitter.com/50Su6sVALd
— England Cricket (@englandcricket) February 5, 2021
जो रुटने आपली शतकी खेळी खेळली. १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा जगातील नववा खेळाडू तर आपल्या ९८,९९ आणि १०० व्या कसोटीत शतक करणारा रुट पहिला फलंदाज ठरला आहे.
Joe Root joins the elite list of scoring a century in 100th Test match. He’s only the 2nd Englishman after Colin Cowdrey. Ricky Ponting only in the list of scoring twin centuries. pic.twitter.com/Y5dERqk8Al
— Adnan Khan 🇮🇳 (@Kh14245350Adnan) February 5, 2021