मुक्तपीठ टीम
टाटा समुहाकडे भारत सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तब्बल ६९ वर्षांनी एअर इंडिया घरी परतल्यावर लगेचच टाटा सन्सच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी एअर इंडिया घरी परतल्याचे म्हटले आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे हार्दिक स्वागत
- एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्या दिवसापासून टाटा एअर इंडिया विकत घेणार असल्याची घोषणा झाली, तेव्हापासून लोक या विमान कंपनीच्या परतावाविषयी बोलू लागले.
- त्यांनी पुढे लिहिले- एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आमच्या ग्रुपमध्ये मी मनापासून स्वागत करतो.
- मी तुम्हा सर्वांसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.
- टाटा कुटुंबात एअर इंडियाचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो.
- चंद्रशेखरन यांनी डिसेंबर १९८६ मध्ये त्यांच्या पहिल्या एअर इंडिया भेटीचा अनुभवही सांगितला आहे.
एअर इंडियाचे हस्तांतरण पूर्ण झाले
- टाटा सन्सच्या अध्यक्षांनी एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
- त्यात त्यांनी एअर इंडियाच्या हस्तांतरणाचे काम गुरुवारी (२७ जानेवारी २०२२) पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
- आता एअर इंडिया टाटा समूहाची आहे.
- चंद्रशेखरन म्हणाले की, आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे.
- आपण पुढे कसे जातो आणि लोकांच्या गरजा कशा पूर्ण करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
६९ वर्षांपूर्वी सरकारने एअर इंडियाचे अधिग्रहण केले
- टाटा समूहाने गुरुवारी सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाची मालकी घेतली आहे.
- ही विमानसेवा सरकारने सुमारे ६९ वर्षांपूर्वी अधिग्रहित केली होती.
- टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, समूह एअर इंडिया परत मिळाल्याने उत्साहित आहे आणि ती जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने १९३२ मध्ये केली…
- टाटा समूहाने १९३२ मध्ये एअर इंडिया सुरू केली.
- मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६ वर्षांनी १९५३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.
- टाटा समूहाने असेही म्हटले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमान वाहतूक क्षेत्राला परवडणारे बनविण्याच्या आणि नागरिकांसाठी “जीवन सुलभ” करण्यासाठी योगदान सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनाशी सहमत आहे.