मुक्तपीठ टीम
अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठाच्या डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या डॉक्टरांनी ब्रेन डेड रुग्णावर डुकराची किडनीचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले आहे. ५७ वर्षीय जिम पर्सन यांचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपघात झाला होता, त्यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही किडन्याही खराब होत्या. कुटुंबीयांच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी जिमच्या दोन्ही किडनी बदलून जनुकीय सुधारित डुकराची किडनी प्रत्यारोपण केली. सर्जिकल टीमच्या म्हणण्यानुसार, प्रत्यारोपणानंतर जवळजवळ २३ मिनिटांनी किडनी पूर्णपणे काम करू लागली.
टीमचे प्रमुख सर्जन डॉ. जायमी लोक म्हणाले की, ही एक मोठी उपलब्धी आहे ज्याने जिवंत रुग्णांवर क्लिनिकल चाचण्यांचा पाया घातला आहे. डॉ. लोक हे अलाबामा विद्यापीठातील इन्कॉम्पॅटिबल किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रामचे संचालक आहेत.
डॉक्टरांनी डुक्कराचे हृदय ही केले प्रत्यारोपण
- अमेरिकेत काही काळापूर्वी मेरीलँड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी जनुकीय सुधारित डुक्कराचे हृदय एका वृद्ध व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केले.
- याबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर, तो विज्ञानाच्या क्षेत्रात मोठा चमत्कार ठरेल.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमधील एनवाययू लँगोन हेल्थ सेंटरमधील काही संशोधकांनी असाच प्रयोग केला होता. यामध्ये डॉक्टरांनी तात्पुरते डुक्कराची किडनी मृत माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केली.
अमेरिकेत सध्या सुमारे १.१० लाख लोक अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत. येथे, अवयव प्रत्यारोपणाच्या अभावामुळे दरवर्षी ६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/SJL4i3l9dfk