Wednesday, May 21, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्र पोलिसांना ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके! वाचा संपूर्ण यादी…

January 26, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Maharashtra Police Headquarters

मुक्तपीठ टीम

भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक आणि ४० गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक पटकाविले आहे. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील सात अधिका-यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

Shri Vinay Kargaokar PPM

“…महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांची कामगिरी महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यानी या सर्व पदक विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीसाठी पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांप्रतिही आदर व्यक्त केला आहे.

 

अग्निशमन सेवेतील रक्षक बाळू देशमुख यांना शौर्यासाठी सर्वोच्च असा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ मरणोत्तर जाहीर झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त करून, दिवंगत देशमुख यांच्या स्मृतींना वंदन केले आहे.

Shri Prlhad Khade PPM

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी गोपाळ उसेंडी, महेंद्र कुलेटी, संजय बकमवार, भारत नागरे, दिवाकर नरोटे, निलेश्वर पड, संतोष पोटावी यांना शौर्य पोलीस पदक तर अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, एसआरपीएफचे कमांडट प्रल्हाद खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलीस उपनिरिक्षक अन्वरबेग मिर्झा यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस दलातील ४० अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

 

महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील अग्निशमन रक्षक बाळू देशमुख यांना सर्वोच्च शौर्यासाठी मरणोत्तर ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय उत्कृष्ट सेवेसाठी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, अग्निशमक सुरेश पाटील, संजय म्हामूणकर, चंद्रकांत आनंददास यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या पोलिस पदकांपैकी ५१ पोलीस पदके महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणे हा महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामगिरीचा गौरव असून राज्यातील उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर केंद्राने केलेले शिक्कामोर्तब आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पोलीस पदक’विजेत्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं अभिनंदन केले आहे. राज्यातील ‘पोलिस पदक’विजेते अधिकारी-कर्मचारी यापुढेही उत्कृष्ट कामगिरी करतील, सहकारी अधिकाऱ्यांना प्रेरणा देतील, महाराष्ट्राचा गौरव वाढवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांचे अभिनंदन करतांना व्यक्त केला आहे.

 

पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 51 पदक मिळाली आहेत.

 

देशातील ८८ पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

 

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम)

  • विनय महादेवराव कारगावकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट मुंबई महाराष्ट्र
  • प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट ६, धुळे
  • चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे
  • अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक एस.पी, नांदेड

 

राज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

  • गोपाळ मनिराम उसेंडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
  • महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलीस हवालदार
  • संजय गणपत्ती बकमवार, पोलीस हवालदार
  • भरत चितांमण नागरे, पोलीस उपनिरीक्षक
  • दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलीस हवालदार
  • निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलीस हवालदार
  • संतोष विजय पोटवी, पोलीस हवालदार

 

राज्यातील एकूण ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’

  • राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई
  • चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, सीपी मीरा भाईंदर, वसई विरार
  • सीताराम लक्ष्मण जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे
  • भारत केशवराव हुंबे, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी
  • गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर
  • अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलीस निरीक्षक, सीपी नवी मुंबई
  • जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलीस निरीक्षक सी.पी. मुंबई
  • विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलीस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर
  • जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई
  • सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर
  • प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट 4, नागपूर
  • मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक,मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई
  • शशिकांत दादू जगदाळे, पोलीस निरीक्षक सीपी, मुंबई शहर
  • रघुनाथ रामचंद्र निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर
  • संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर
  • राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर
  • प्रकाश भिला चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
  • नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर
  • राजेश रावणराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी परभणी
  • शिवाजी विठ्ठल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर
  • राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी जळगाव
  • देवेंद्र परशराम बागी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
  • संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा
  • बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी. कोल्हापूर
  • पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
  • विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
  • पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई
  • राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर
  • अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा
  • संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,
  • रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ
  • अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर
  • सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर
  • बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली
  • काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे
  • अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर
  • आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली
  • मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
  • सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर
  • लहू मनोहर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

Tags: GoodNewsmaharashtra policemuktpeethPolice Medalrepublic dayUnion Home Ministryकेंद्रीय गृह मंत्रालयचांगल्या बातम्यापोलीस पदकप्रजासत्ताक दिनमुक्तपीठराष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक
Previous Post

बिहारमध्ये रेल्वे भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप: रेल्वे पेटवली!

Next Post

राज्यात ३५ हजार ७५६ नवे रुग्ण, ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post
maharashtra corona report

राज्यात ३५ हजार ७५६ नवे रुग्ण, ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!