Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाचा जर्मन नौदलासोबत होणार सागरी सराव

January 23, 2022
in घडलं-बिघडलं
0
Indian Navy will conduct naval exercises with German Navy

मुक्तपीठ टीम

येत्या काही कालावधीतच भारतीय नौदलाचा जर्मन नौदलाच्या ताफ्यातील ‘ फ्रिगेट बायर्न’ नौकेसोबत सागरी सराव (पॅसेज सराव) होणार आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील नौदल संबंधांना बळकटी देणारी जर्मन ‘ फ्रिगेट बायर्न एफ २१७’ गुरुवारी मुंबईत दाखल झाली. या युद्धनौकेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर आणि महाराष्ट्राचे राजशिष्टाचार , पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले.

‘ही फ्रिगेट ‘कोरोना’ काळात येथे डॉकिंग करणे शक्य केले. दोन मित्रांमध्ये ही भेट आहे. ६० % आंतरराष्ट्रीय व्यापार पॅसिफिक प्रदेशातून जातो, असे भारतातील जर्मन राजदूत यावेळी म्हणाले. २४ जानेवारी पर्यंतच्या अवधीसाठी जर्मन नौदलातील नौका ‘बायर्न’ मुंबईत पोहचली. मुंबई येथे ‘पोर्ट कॉल’ करणार असलेल्या  ‘बायर्न’च्या भेटीची पूर्वसूचना होती. ही भेट पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांच्या नौदलांमधील व्यावसायिक संबंध अधिक वाढवण्यासाठी भारतीय नौका ‘विशाखापटण्म ’ सोबत पॅसेज सरावाचे नियोजन करण्यात आले आहे.

‘बायर्न’ही फ्रिगेट नौैका (एफ २१७) जर्मन नौदलातील ब्रँडडेनबर्ग वर्गातील आहे. जर्मनीने हँबर्ग क्लास विनाशिकांच्या जागी ब्रँडडेनबर्ग वर्गातील या फ्रिगेट नौैका आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. ‘बायर्न’ही फ्रिगेट नौैका १५ जून १९९६ मध्ये जर्मनी देशाने नौदल ताफ्यात दाखल केली आहे. ती फ्रिगेट नौका ४५५.५ फुट लांबीची आहे. तिचा वेग २९ सागरी मैल (५४ किमी/ वेग ताशी ३३ किलोमीटर ) इतका आहे. ही नौका अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, विमानावर डागता येणारी क्षेपणास्त्रांसह या नौकेवर ‘दोन सी लिंक्स’ हेलिकॉप्टर्स असून, पाणबुडीविरोधी पाणतीर (टॉर्पेडोज्), हवेतून जमीनीवर मारा करणारी ‘सी स्कुआ’ क्षेपणास्त्रे डागता येतात शिवाय ‘हेवी मशिनगन’ने ती सज्ज आहे.

तत्पूर्वी, २० जानेवारी २२ रोजी मुंबईतील जर्मनीचे महावाणिज्य दूत डॉ. जुर्गेन मोर्हाड यांनी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे ध्वजाधिकारी व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांची भेट घेतली. त्यांनी ‘मेक इन इंडिया’ संरक्षण तंत्रज्ञान, व्यावसायिक सहकायार्साठी पुढाकार आणि दोन्ही नौदलांमधील सामायिक सागरी हितसंबंध यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.


Tags: Aaditya ThackerayFrigate Bayern F217german NavyIndian Navymumbaiफ्रिगेट बायर्न एफ २१७भारतीय नौदलमुंबई
Previous Post

शपथेचा भंग केल्यामुळे मविआ मंत्रिमंडळ बरखास्तीची मागणी

Next Post

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये अपघातात : ४४ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू, कामगारांमध्ये संताप

Next Post
electrician dies in Western Railway Lower Parel workshop accident

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये अपघातात : ४४ वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू, कामगारांमध्ये संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!