Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप

January 22, 2022
in घडलं-बिघडलं
0
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप 1

मुक्तपीठ टीम

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज २१ जानेवारी २०२२ रोजी सुमारे ३०० जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. भानशीला पाडा, पासपोली गाव, पाईपलाईन रोड, पेरूबाग, पासपोली मरोळ बामन पाडा, साकी विहार या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समावेश आहे.

            

भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश दिले होते. याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ३५ दाखल्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात भानशीला पाडा ठिकाणी वाटप करून कार्यक्रमास सुरूवात केली. उर्वरित दाखल्यांचे वाटप घरपोच करण्यात आले.

            

वाड्या-पाड्यातील दुर्गम आदिवासींना जातीचे दाखले मिळण्यास अडचण येते. अशिक्षितपणा असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल म्हणून सदर वाड्या-पाड्यांवर तहसीलदार व आदिवासी विकास विभागामार्फत शिबिरांचे आयोजन करून आदिवासी बांधवांकडून जातीच्या दाखल्याचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये आदिवासी मंडळ, तरूण मंडळ व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शविला. या माध्यमातून एकूण 500 अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी करून व काही ठिकाणी पुरेसे पुरावे नसल्यास गृह चौकशी करून त्याठिकाणी राहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचे जवाब, पंचनामे घेऊन संबंधित व्यक्ती त्याठिकाणी पूर्वापार राहत आहे किंवा नाही याची खात्री करण्यात आली. अशा अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येऊन महसूल प्रशासनामार्फत या दाखल्यांचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाड्यांवरील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

            

या कार्यक्रमप्रसंगी नगरसेविका चंद्रावती मोरे, कुर्ला तहसीलदार संदीप थोरात, अंधेरी तहसीलदार श्री.भालेराव, उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव सोनवणे, आदिवासी प्रकल्प विभागाच्या सुप्रिया पवार तसेच भानशीला पाड्यातील रवींद्र दोडिये, मीनाताई रावते, मनीष जनेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Tags: AdivasiNidhi Chaudharyआदिवासीनिधी चौधरी
Previous Post

‘महाराष्ट्र चेंबर पत्रिके’चे ५१ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे माहिती महासंचालक दीपक कपूर यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

‘भरारी’चे प्रकाशन; ज. मो. अभ्यंकरांचे आत्मचरित्र प्रेरणादायी – सुभाष देसाई

Next Post
Publication of Maharashtra Chamber Magazine by Deepak Kapoor

'भरारी'चे प्रकाशन; ज. मो. अभ्यंकरांचे आत्मचरित्र प्रेरणादायी - सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!