Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या स्टार्टअप्सचा पुरस्कारांमध्ये झेंडा, सेनादलांसाठीच्या ‘उड चलो’चाही गौरव!

January 19, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Ud Chalo

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४६ आघाडीच्या स्टार्टअप्सचा नुकताच गौरव केला. भारतभरातील १५० स्टार्टअप्स आणि त्यांचे गुंतवणूकदार त्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये सहभागी होते. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यात पुण्यातील अत्रेया इनोव्हेशन्स प्रा.लि., रिपोज आयओटी इंडिया प्रा. लि., पिवोटचेन सोल्यूशन्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि उड चलो या ट्रॅव्हल अॅपवाल्या अपक्यूअर बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. या चार स्टार्टअप्सचा समावेश होता. त्यातही ‘उड चलो’ची संकल्पना व्यवसायाबरोबरच देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सेनादलांसाठीचा प्रवास-पर्यटन सुकर करण्याची असल्याने चर्चेचा विषय ठरली. सेनादलातील जवानांना ग्राहक उत्पादने आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी गेली ९ वर्षे उडचलोतर्फे अनोखे सुलभ आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या दरवर्षी सशस्त्र सेना दलांतील सुमारे १६ लाख कर्मचारी उडचलोच्या माध्यमातून तिकिटांचे आरक्षण करत असतात.

 

‘उड चलो’ वेगळी संकल्पना असल्याने गौरव

  • प्रवास श्रेणीमध्ये केवळ तीनच स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले.
  • प्रवास नियोजन आणि संशोधन श्रेणीतील सर्वात नाविन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावी स्टार्टअप म्हणून ‘उडचलो’ला पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
  • सशस्त्र सेना दलांसाठी (आर्म्ड फोर्सेस) प्रवासाचे आरक्षण करणारी उडचलोची सुलभ आणि सुकर इंटरफेस सुविधा ही या श्रेणीमधील सर्वात आगळी आणि उल्लेखनीय होतील.
  • सेनादलातील जवानांना ग्राहक उत्पादने आणि सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी गेली ९ वर्षे उडचलोतर्फे अनोखे सुलभ आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • सध्या दरवर्षी सशस्त्र सेना दलांतील सुमारे १६ लाख कर्मचारी उडचलोच्या माध्यमातून तिकिटांचे आरक्षण करत असतात.

 

उडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, “भारतातील सशस्त्र सेना दलांप्रती (आर्म्ड फोर्सेस) आमच्या मनात असलेल्या प्रचंड आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेतून आम्ही उडचलोची स्थापना केली. या समुदायाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या देशासाठी कितीतरी त्याग केलेला आहे. एक स्टार्टअप या भूमिकेतून आम्ही केवळ एक छोटासा बदल घडवून आणण्याचा विचार करू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनात फरक पडू शकेल. या देशाचे भवितव्य म्हणून ओळख मिळणे आणि अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करता येणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे उडचलो च्या संपूर्ण टीमवर प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आणि व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने एक स्टार्टअप या नात्याने आपण नक्कीच परिणामकारक प्रभाव पडू शकू याबाबत आम्ही आशावादी आहोत.”

मंत्रालयाकडे या पुरस्कारांसाठी ४९ विविध उपश्रेणींत मिळून २१७७ हून जास्त अर्ज आले होते. त्यापैकी एकूण १७५ स्टार्टअप्सचे अर्ज अंतिम फेरीपर्यंत पोचले आणि नाविन्य, प्रमाणता, सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणाशी संबंधित प्रभाव, समावेशकता आणि वैविध्यपूर्णता यांच्या आधारे या अर्जांचे परीक्षण करण्यात आले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndian Armymuktpeethpmo indiapmo narendra modiPune Startups AwardUd Chaloउड चलोचांगल्या बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदीपुणे स्टार्टअप्स पुरस्कारमुक्तपीठसेनादल
Previous Post

गाव तसं छोटं, पण कार्य मोठं! विधवांचा हळदीकुंकू, पुस्तकांचं वाण!!

Next Post

फेसबुक मेटाव्हर्सवर रिसेप्शनचा होणार धुमधडाका, एका लग्नाची व्हर्चुअल गोष्ट!

Next Post
Metaverse wedding

फेसबुक मेटाव्हर्सवर रिसेप्शनचा होणार धुमधडाका, एका लग्नाची व्हर्चुअल गोष्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!