Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोले म्हणाले, “मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो” वादानंतर पलटले, “‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावगुंड!”

January 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nana Patole

मुक्तपीठ टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच भाजपाविरोधात आक्रमक होत असतात. नेहमीच ते त्यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान नाना पटोले यांनी यावेळी चक्क देशाच्या पंतप्रधान मोदींना मारण्याची भाषा केल्याचा आरोप झाला आहे. नाना पटोले यांनी ‘ मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो’ असे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्वाभाविकच भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, वाद वाढत गेल्याने पटोले यांनी आता स्पष्टीकरण दिली आहे, त्यांचे म्हणणे, “मी पंतप्रधान असा उल्लेख केलेला नाही. ‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावकऱ्यांनी तक्रार केलेला एक ‘मोदी’ नावाचा एक गावगुंड आहे!”

 

पटोले नेमकं काय म्हणाले होते?

  • आता पटोले यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • या व्हिडीओमध्ये ते मोदींबद्दल आक्षपार्ह भाषा करत आहे.
  • मी का भांडतो? मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे.
  • लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात.
  • शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात.
  • मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली.
  • एक ठेकेदारी नाही केली.
  • जो आला त्याला मदत करतो.
  • म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला.
  • एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे.

 

नाना पटोलेंच्या या व्हायरल व्हिडीओविरोधात संताप उसळला. भाजपा नेत्यांनी रस्त्यांपासून सोशल मीडियापर्यंत संताप व्यक्त केला. त्यानंतर नान पटोले यांनी वेगळाच खुलासा केला.

नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

  • नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे.
  • “जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत.
  • सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते.
  • त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो.
  • तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही.
  • मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे.
  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही.

मुक्तपीठ भूमिका

देशाचे पंतप्रधान असणाऱ्या नेत्याविषयीच नाही तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या किंवा सोबत असणाऱ्या कोणत्याही नेत्याविषयी अशी मारण्याची, शिवीगाळीची भाषा खपवून घेतली जावू नये.

नाना पटोले हे आक्रमक नेते आहेत. काँग्रेस सोडून भाजपात गेल्यावर ते खासदार म्हणून निवडून आले होते. पण काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याने, मोदींची कार्यशैली न पटल्याने ते परतले. पुन्हा भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढत असतात. पण बोलताना भान राखलंच पाहिजे. आक्रमकता ही तर्कशुद्ध असावी आक्रस्ताळी नसावी. डोकं शांत ठेऊनच सध्याच्या काळात नेत्यांनी कुठेही, कधीही बोलावे. जसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याबाबतीच्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला तसा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात बोलल्यामुळे नाना पटोले यांच्याविरोधातही होणे, आवश्यक आहे.

गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!


Tags: BJPCongressnana patoleNarendra modiनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपा
Previous Post

सीमा सुरक्षा दलात २ हजार ७८८ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!

Next Post
nana patole vs bjp

गल्लीतील 'नाना'भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!