मुक्तपीठ टीम
भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एकाच वेळी चार नवीन प्री-पेड योजना सादर केल्या आहेत. बीएसएनएलच्या या प्लानच्या किंमती १८४, १८५, १८६ आणि ३४७ रुपयांपर्यंत आहेत. या प्लानसह, ग्राहकांना हाय-स्पीड डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि विनामूल्य एसएमएस मेसेज सेवा मिळतील. बीएसएनएलचे हे प्लान स्पेशल टॅरिफ व्हाउचर अंतर्गत सादर करण्यात आले आहेत. टेलीकॉमटॉकने सर्वप्रथम बीएसएनएलच्या या प्लानची माहिती दिली आहे.
बीएसएनएलचे फायदे
- १८४ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १ जीबी डेटा दररोज मिळेल.
- या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहेत.
- १८५ रुपयांच्या प्लानची वैधता देखील २८ दिवसांची आहे.
- या प्लानमध्येही सर्व नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी कॉलिंग उपलब्ध असेल. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस सुविधाही मिळणार आहे.
- यामध्ये अरेना मोबाईल गेमिंगची सेवाही २८ दिवस उपलब्ध असेल.
- १८६ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
- यामध्येही दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.
- हार्डी गेम सेवा या योजनेसह उपलब्ध आहे.
- बीएसएनएल ३४७ रूपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएससह २जीबी डेटा देखील मिळेल.
- या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यामध्ये देखील एरिना मोबाईल गेमिंग सेवा ५६ दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असेल.
अलीकडेच बीएसएनएलने म्हटले आहे की, इतर कोणत्याही नेटवर्कवरून त्यांच्या नेटवर्कवर येणाऱ्या ग्राहकांना ५ जीबी डेटा विनामूल्य मिळेल. या मोफत डेटाची वैधता ३० दिवसांची असेल. फ्री डेटासाठी एक अट अशी आहे की, तुम्हाला सोशल मीडियावर बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये एमएनपी करण्याचे कारण द्यावे लागेल आणि कंपनीचा पुरावा पाठवावा लागेल.
बीएसएनएलच्या या नवीन मोफत डेटा ऑफरची मुदत आता संपली असल्याचे कळते. मात्र, लवकरच बीएसएनल अशा आणखी चांगल्या ऑफर सादर करणार असल्याचे कळते. तशा काही ऑफर त्यांच्या वेबसाइटवर तपासल्याही जाऊ शकतात.
पाहा व्हिडीओ: