मुक्तपीठ टीम
शेतकरी कामगार पक्षाचे नेते एवढ्या ओळखीपुरतेच नाही तर इतर कोणत्याही ओळखीपुरते मर्यादित नसलेल्या एन.डी.पाटीलांच्या जीवनाच्या यात्रेची अखेर झाली. मनाला न पटणार हे सत्य पचवताना अवघा महाराष्ट्रात हळहळत आहे. त्यांना वेगवेगळ्या नेत्यांनी वाहिलेली श्रद्धांजली एन.डींच्या पक्षातीत व्यक्तिमत्वाची महानता दाखवते…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी ‘ब्र’ काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने ‘एन. डी.’ उभे राहिलेच म्हणून समजा.
“अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.
“शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 17, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार
“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर,आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित,उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे.सीमाभागातील मराठी भाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/MRIDOakm4L
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 17, 2022
शरद पवार
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही.सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. pic.twitter.com/HJy9s1TWgT
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 17, 2022
चंद्रकांत पाटील
संघर्षाला पर्यायी शब्द असेल तर एन.डी . पाटील हे होय. टोलच्या आंदोलनासारखा मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. एन.डी. पाटील यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही. विरोधी पक्षात असूनही माझ्यावर त्यांच विशेष प्रेम होतं. टोलच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या सोबत आंदोलन केलं. टोलची खोकी गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर होतं. गोविंद पानसरे यांच्या जाण्यानं त्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, सहकारी गेल्यानं कोलमडून पडणारे ते नव्हते.
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली ! ॐ शांती pic.twitter.com/eps71kjbw7
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 17, 2022
बाळासाहेब थोरात
ज्येष्ठ नेते व पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील साहेबांच्या निधनामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ नेते व पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील साहेबांच्या निधनामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/dd5HjMuPcm
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 17, 2022
दिलीप वळसे पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. शोकाकुल कुटुंबियांसाठी माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो!
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. शोकाकुल कुटुंबियांसाठी माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो! pic.twitter.com/y0DctcGAlG
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) January 17, 2022
जयंत पाटील
महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा.एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले.
महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. pic.twitter.com/9OpwWDBS45
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 17, 2022
नीलम गोऱ्हे
शेतकरी कामगारांचे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते मा.एन. डी.पाटील यांचे दुःखदायक निधन झाले.ते विधानपरिषदेत तीनवेळा,सभेत १वेळा निवडुन गेले होते.जनतेच्यी प्रश्नांसाठी त्यांनी सर्व आयुष्य समर्पित केले. भावपुर्ण श्रद्धांजली!
#श्रद्धांजली शेतकरी कामगारांचे व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते मा.एन. डी.पाटील यांचे दुःखदायक निधन झाले.
ते विधानपरिषदेत तीनवेळा,सभेत १वेळा निवडुन गेले होते.जनतेच्यी प्रश्नांसाठी त्यांनी सर्व आयुष्य समर्पित केले.
भावपुर्ण श्रद्धांजली🙏@MahaDGIPR @ShivSena @MaViAaghadi pic.twitter.com/aLrxW6p6VC— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) January 17, 2022
रावसाहेब दानवे
शेतकरी आणि कामगारांचे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रा. नारायण ज्ञानदेव उर्फ एन. डी. पाटील यांना विनम्र श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
शेतकरी आणि कामगारांचे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रा. नारायण ज्ञानदेव उर्फ एन. डी. पाटील यांना विनम्र श्रद्धांजली.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांती🙏 pic.twitter.com/7SAGQeig4D— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 17, 2022
सुनिल तटकरे
माजी मंत्री, पुरोगामी विचारवंत, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते म्हणून त्यांना ओळखले जायचे. एन.डी.पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला आहे.
माजी मंत्री, पुरोगामी विचारवंत, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते म्हणून त्यांना ओळखले जायचे. एन.डी.पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला आहे. pic.twitter.com/ikfNE85EAq
— Sunil Tatkare (@SunilTatkare) January 17, 2022
रोहित पवार
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विवेकाचा बुलंद आवाज, थोर विचारवंत, एक तत्त्वनिष्ठ समाजकारणी, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासाठी झटणारा एक लढवैय्या पुरोगामी नेता अर्थात प्रा. एन. डी. पाटील सर (९३) यांच्या निधनाची वार्ता ही मन हेलावून टाकणारी आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विवेकाचा बुलंद आवाज, थोर विचारवंत, एक तत्त्वनिष्ठ समाजकारणी, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासाठी झटणारा एक लढवैय्या पुरोगामी नेता अर्थात प्रा. एन. डी. पाटील सर (९३) यांच्या निधनाची वार्ता ही मन हेलावून टाकणारी आहे. pic.twitter.com/FwJQseGVTH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 17, 2022
जितेंद्र आव्हाड
जेष्ठ्य नेते प्रा.एन.डी पाटील सरांचं निधन झालं,हि बातमी आताच कळाली.सरांचं आपल्यातून निघून जाणे,ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे.आपल्या तत्वाशी कोणतीही तडजोड न करणार अजातशत्रू नेतृत्व म्हणून एन.डी.पाटील सरांची ओळख होती.
भावपूर्ण श्रद्धांजली..!!
जेष्ठ्य नेते प्रा.एन.डी पाटील सरांचं निधन झालं,हि बातमी आताच कळाली.सरांचं आपल्यातून निघून जाणे,ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे.आपल्या तत्वाशी कोणतीही तडजोड न करणार अजातशत्रू नेतृत्व म्हणून एन.डी.पाटील सरांची ओळख होती.
भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/9c2U68SiW9— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2022
नितिन गडकरी
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी – कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी – कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 17, 2022
धनंजय मुंडे
शोषित-वंचितांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज, ज्येष्ठ नेते तथा पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने न्यायासाठी तळमळीने संघर्ष करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
शोषित-वंचितांचा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा आवाज, ज्येष्ठ नेते तथा पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या निधनाने न्यायासाठी तळमळीने संघर्ष करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/geQL7KicO9
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 17, 2022
रुपाली चाकणकर
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी .पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा, शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा ‘आवाज’ बनलेला लढवय्या नेता महाराष्ट्राने आज गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी .पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा, शेतकऱ्यांचा व सर्वसामान्यांचा ‘आवाज’ बनलेला लढवय्या नेता महाराष्ट्राने आज गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏 pic.twitter.com/lY1HLxB0u0
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2022
सतेज पाटील
शेतकरी,कष्टकरी,कामगारांचे कैवारी,पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ,ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले.
भावपूर्ण श्रद्धांजली!
शेतकरी,कष्टकरी,कामगारांचे कैवारी,पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ,ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. pic.twitter.com/vz7l4KYuH6
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) January 17, 2022
राजू शेट्टी
एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही.
एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं.
ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची.
टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला.
हसन मुश्रीफ
एन.डी. पाटील यांच्या रुपानं झुंजार नेता हरपल्याची भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
वयाच्या ९० व्या वर्षीदेखील त्यांनी रस्त्यावर लढा उभारल्याचं ते म्हणाले.
रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारामध्येही त्यांनी काम केल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.
कोणताही लाभ व हानी यापलीकडे जाऊन त्यांनी केलेली समाजाची सेवा अनन्यसाधारण आहे. pic.twitter.com/WSlvHIeD9y
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) January 17, 2022
सचिन पाटील
माजी आमदार प्रा. एन डी पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. सामाजिक व राजकीय चळवळीतील एका पर्वाचा अंत झाला आहे.पाटील साहेब शेवटपर्यंत तत्वांशी, विचारांशी प्रामाणिक राहिले. साधी राहणी व उच्च विचारसरणी असे त्यांचे जीवन येणाऱ्या अनेक पिढ्यांना आदर्श ठरेल. भावपूर्ण श्रद्धांजली
डॉ. मेघा पानसरे
आमचा मार्गदर्शक आवाज, आधार , आमचा आदर्श, घरातील व्यक्ती हरपला, पानसरेच्या खुनाच्या केस मध्ये पानसरेना न्याय मिळावा , याबाबत सतत पाठपुरावा केला- डॉ. मेघा पानसरे