मुक्तपीठ टीम
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महादु:खाचा आहे. स्वत:साठी जगणारे खूप असतात. पण समाज, त्यातही सामान्यांसाठी जगणारे खूपच कमी असतात. अशांपैकीच एक असणाऱ्या एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. सामान्यांसाठी लढणारा, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी धडपडणारा लढवय्या नेता महाराष्ट्रानं आज गमावला आहे!
ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी ते जीवनभर लढले आहेत. त्यांच्या निधनाने कोल्हापूरासह अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
डॉ. अशोक भूपाळींकडून सुरु होते उपचार
- एन.डी. पाटील हे डॉ भूपाळींकडे ८ वर्ष उपचार घेत आहेत.
- त्यांची एक किडनी काढण्यात आली होती.
- त्यामुळे त्यांना कमालीची काळजी घ्यावी लागत असे.
- ११ जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अॅडमिट केलं गेलं होतं.
- ज्या अत्याधुनिक उपचारांन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणतेही पुढील उपचार केले गेले नाहीत.
- गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती.
संघर्षात कायम माईंची साथ!
- एन. डी. पाटील यांना गेल्या वर्षी दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग झाला होता.
- त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर मात केली होती.
- कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या परिस्थितीत एन. डी. पाटील यांची त्यांच्या पत्नी आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेच्या सरोज पाटील यांनी घेतली.