मुक्तपीठ टीम
सध्या राज्यात अभिनेते किरण माने यांचे प्रकरण गाजत आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या राजकीय भूमिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीवरील‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून त्यांना काढण्यात आले आहे. याच्या विरोधात त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण पुढे सरसावले आहेत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही माने यांचं समर्थन करत केंद्र सरकार विरोधात बोलणे गुन्हा कसा, असा सूर लावला आहे.
जितेंद्र आव्हाडांचा किरण मानेंना पाठिंबा
- जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे.
- स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने हा अभिनेता फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहतो.
- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो, म्हणून अचानक मालिकेतूल काढून टाकले गेले.
- “या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल. देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला गेला.
- याद राखा, हा महाराष्ट्र वैचारिक वारसा जोपासतात तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही.
स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 13, 2022
उदय सामंत यांचा केंद्र सरकारवर निशाणा!
- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माने यांच्या प्रकरणावरून आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
- प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, केंद्र सरकारच्या विरोधात मत असू दे किंवा राज्य सरकारच्या विरोधात असू दे, हा त्या व्यक्तीचा अधिकार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
- तसेच केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.
- मी त्यांच्या अनेक पोस्ट पाहिल्या आहेत.
- त्यांनी एसटी संपावर देखील आपले मत मांडले होते.
- त्यांनी केलेल्या सूचना जर चांगल्या असतील तर त्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते केवळ केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढणे कितपत योग्य आहे?
महाराष्ट्रात दडपशाही चालू देणार नाही-अतुल लोंढे
- अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही.
- त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे.
- सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का?
- अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे.
- महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही.
- संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे.
- एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष तो कधीही खपवून घेणार नाही.
- काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
- आरएसएस विचाराची ही दडपशाही महाराष्ट्रात चालणार नाही.
- फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा विभाजनवादी विचारांना थारा नाही.
- भाजपा सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त केले म्हणून ‘स्टार प्रवाह’ या खाजगी वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून काढण्यात आले.
- हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे.
महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही- बाबासाहेब पाटील
- अशा झुंडशाही विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.
- बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आहेत.
- शरद पोंक्षे,आरोही वेलणकर, कंगना राणावत, अनुपम खेर, यांच्या सारखे कलाकार उघड-उघड भाजप समर्थनार्थ आपले मत मांडत असतात, अशा वेळी त्यांना चित्रपट किंवा नाटकातून काढण्यात येत नाही.
- याउलट त्यांना पद्मश्री व एफ टी आय सारखी मोठी मोठी लाभाची पदे देऊन सन्मानित केले जाते.
- सांस्कृतिक क्षेत्र हे जनजागृतीचे एक उत्तम माध्यम आहे.
- अशावेळी मतमतांतरे ही प्रत्येक कलावंतांची किंवा प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकतात.
- दरम्यान एखाद्या कलाकाराला त्याच्या वैयक्तिक मतासाठी अशा प्रकारचे कृत्य करणे म्हणजे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे.
- त्यामुळे किरण माने यांनी यापुढे स्वतःला एकटे समजू नये त्यांच्या पाठीशी अखा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे तर किरण माने यांना वाहिनीने परत सन्मानाने कामावर घ्यावे, अन्यथा मुलगी झाली हो या सिरियलचे पुढील भाग चित्रीत होऊ देणार नाही.