मुक्तपीठ टीम
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने हे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील प्रखर भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या राजकिय आणि सामाजिक विषयांवर ते सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. मात्र आता त्यांना हेच नडल्याचे दिसत आहे. किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यांनी सूचक इशारा दिला आहे. त्यात काट टो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मैं. पेड बनही जाऊंगा! अशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर आता माने चाहत्यांकडून जोरदार समर्थन केलं जात आहे तर काहींकडून टीकाही केली जात आहे.
किरण मानेंना ट्रोलर्सचा त्रास, मालिकेतून कटाप!
- देशातील नागरिकांच्या दुर्दैवानं बातमी खरी आहे.
- तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवायचा नाही किंवा तुम्ही कुठल्या विचारधारेविरोधात आवाज उठवायचा नाही.
- नाहीतर आम्ही तुमच्या पोटावर पाय आणू, तुमचं जगणं मुश्किल करु असा एक संदेश देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे.
- याचं कारण आहे की मी राजकीय पोस्ट म्हणता येणार नाही.
- पण मी एक विचारधारा मानणारा माणूस आहे आणि तशा पोस्ट मी करत असतो.
- बऱ्याच पोस्ट माझ्या या तुकाराम महाराजांचे विद्रोही जे अभंग आहेत, त्याचं आताच्या परिस्थितीला जोडून निरुपण मी करत असतो.
- तुम्ही फेसबुकवर शोधलं, #तुकाआशेचाकिरण तर त्यावर तुम्हाला माझ्या अनेक पोस्ट सापडतील.
- ज्या तुकाराम महाराजांचे अभंग घेऊन त्यातील विद्रोही विचारांची उकल मी आजच्या परिस्थितीशी जोडून केलेली आहे.
- त्याच्या विरुद्ध विचारधारा जी आहे, ज्या विचारधारेनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं ज्ञानोबांना त्रास दिला, ज्या विचारधारेनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला.
- त्या विचारधारेचे लोक पेटून उठतात.
- मला खूप त्रास झाला या ट्रोलर्सचा.
सोशल मीडियावर किरण मानेंच्या समर्थनार्थ नेटकरी!