मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पदवीधर/ डिप्लोमा धारक असणाऱ्यांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पदवीधर इंजिनीअर अॅप्रेंटिस या पदासाठी १४५ जागा, टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदावर ५ जागा अशा एकूण १५० जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी (बी.ई/ बी.टेक)
- पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.