मुक्तपीठ टीम
एका महिलेने तिच्या नवऱ्याने तिला वाईफ स्वॅपिंग करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर नवऱ्याविरोधात
करण्याचा आणि २५ लाख रुपये हडपल्याचा आरोपही केला आहे. ही महिला नर्स आहे, तर नवरा रेल्वे कर्मचारी आहे.
आरोप करताना तिने सांगितले , “नवरा मला बोलला आपण मुंबईला जाऊया, मी तिथे एका ग्रुपचा भाग आहे जिथे बायकांची अदलाबदली करून मजा करतात.”
या महिलेचे हे दुसरे लग्न आहे. आधी तिचा घटस्फोट झाला आहे. पोलिसांनी आरोपी रेल्वे कर्मचाऱ्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
या महिलेचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. घटस्फोट झाल्यानंतर महिलेला २५ लाख रूपये आणि ५ लाख रुपयांचे दागिने मिळाले. यानंतर तिचे विनोद या माणसासोबत लग्न झाले. तो दातिया गावात राहतो, तो रेल्वे कर्मचारी आहे आणि सध्या तो मुंबईमध्ये असतो. त्याने या आधी या महिलेला सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवली होती ती तिने मान्य केली नाही. नंतर त्याने तिला भेटून लग्नासाठी विचारले, तिच्या घरचेही तयार झाले. २६ जानेवारी २०२० रोजी दोघांनी लग्न केले.
लग्नाआधीच अत्याचार
पीडितेने सांगितले लग्न ठरल्यानंतर विनोदने तिच्यासोबत चुकीच्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवले. तिने नकार दिला तरी तो तिचे काही ऐकायचा नाही. लग्नानंतरही असेच व्हायचे. यानंतर तिने पहिल्या नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशातून भाड्याने घर घेतले.
मुंबईला येण्यास नकार दिल्यावर मारले
लॉकडाऊन झाल्यापासून तो घरी आला नाही. त्यानंतर महिला सासर सोडून माहेरी आली. थोड्या दिवसाने नवरा येऊन तिला बोलला आपल्याला मुंबईला जायचे आहे. महिलेने विचारले तुम्ही ग्वाल्हेरला ट्रान्सफर घेणार होतात. तेव्हा नवऱ्याने सांगितले मी मुंबईला एक ग्रुप जॉईन केला आहे. या ग्रुपमधले सगळे वीक एन्डच्या दिवशी भेटून पार्टी करतात. आणि या ग्रुप मध्ये आपले पार्टनर बदलून सगळे मजा करतात. तिने ते ऐकल्यावर मुंबईस येण्यास नकार दिल्यावर नवऱ्याने तिला खूप मारले आणि सोडून दिले. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वाइफ स्वॅपिंग काय असतं?
- काही विशिष्ट आवडीचे स्त्री-पुरुष पार्टीच्या निमित्ताने एकत्र येतात
- तिथे ठरवून परस्परांच्या जोडीदारांची अदला-बदली केली जाते
- हे करण्यासाठी एकतर ठरवून, परस्पर संमतीने किंवा मग वेगळ्या पद्धतीने जोडीदार निवडले जातात.
- गाडीच्या चाव्या टेबलवर ठेऊन त्यातील चावी निवडली जाईल तो जोडीदार अशी एक पद्धत सांगितली जाते
- ही चावी निवडण्याची पद्धत पूर्वीच्या घटकंचुकीशी मिळती-जुळती असल्याचे जाणकार सांगतात.
- पूर्वी उत्तर पेशवाईत घटात कंचुकी टाकून निवडली जाई, जिची कंचुकी ती स्त्री त्या पुरुषासोबत असे खेळ चालत, अशी माहिती दिली जाते.
- अतिश्रीमंत समाजातील पूर्वी असलेले हे खुळ आता मध्यमवर्गीयांमधील काहींमध्ये झिरपले असल्याचे दिसते.
- गेल्या काही दिवसांमध्ये काही पुरुष आपल्या पत्नीवर वाइफ स्वॅपिंग ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप होत आहे.
- स्वॅपिंगसाठी जोडीदार सक्ती करत असेल तर महिला कायदेशीर तक्रार नोंदवू शकते
- योग्य काळजी घेतली जात नसेल, किंवा अनेक जोडीदारांशी संबंध येत असल्याने अशा तथाकथित मजेत आरोग्यविषयक धोकेही असल्याचे तज्ज्ञ सांगतात.