मुक्तपीठ टीम
लक्झरी वाहन निर्माता कंपनी BMWने एक नवीन आणि चकित करणारे तंत्रज्ञान सादर केले आहे. ज्यामध्ये बटण दाबल्यानंतर कारचा रंग बदलतो. कंपनीने जगातील सर्वात मोठ्या सीईएस २०२२ टेक शोमध्ये आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचा आयएक्सद्वारे डेमो दाखवला. जिथे BMWने एक अप्रतिम रंग दाखवला, तिथे कारचा रंग आपोआप बदलत आहे.
बीएमडब्ल्यू कारच्या आकर्षक फिचरचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
- बीएमडब्ल्यूचे हे नवीन तंत्रज्ञान पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
- सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये BMW आयएक्स इलेक्ट्रिक कारचा रंग आपोआप बदलताना दिसत आहे.
- शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, जर्मन ऑटोमेकरची ही पेंट स्कीम दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये बदलू शकते.
- ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, BMW आयएक्स इलेक्ट्रिक कार स्वतःहून पांढऱ्या ते गडद राखाडी रंगात बदलताना दिसत आहे.
- तसेच, या तंत्रज्ञानाबद्दल कंपनीने आधीच सांगितले होते की, ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत ज्याच्या मदतीने BMW कार एक बटण दाबल्यावर त्यांचा रंग बदलू शकतील.
कार १५ डिसेंबर रोजी भारतात लॉन्च करण्यात आली होती
- BMWने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही BMW आयएक्स १५ डिसेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच केली.
- ही इलेक्ट्रिक कार दिसण्यात आकर्षक तर आहेच, परंतु ती पॉवर आणि रेंजमध्येही चांगली आहे.
- BMWची ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ४२५ किमी पर्यंत धावू शकते.
- ही कार पूर्णपणे बिल्ट-अप युनिट आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची थेट आणि खडतर स्पर्धा ऑडी, मर्सिडीज सारख्या इलेक्ट्रिक लक्झरी कारशी आहे.
ही लक्झरी एसयूव्ही फक्त ६.१ सेकंदात ० ते १०० kmph चा टॉप स्पीड पकडते. दुसरीकडे, जर तुम्ही चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही ही कार १५० केडब्ल्यूचे डीसी चार्जर वापरून अवघ्या अर्ध्या तासात ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल, याशिवाय, जर ५० किलोवॅटचा डीसी चार्जर असेल तर तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे दीड तास लागू शकतो.
पाहा व्हिडीओ: