मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अमेरिकतेतील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मॅंडरिन ओरिएंटल जवळजवळ ७२९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. २००३ मध्ये बांधलेले, मँडरिन ओरिएंटल हे ८० कोलंबस सर्कल, न्यूयॉर्क येथे असलेले एक लोकप्रिय लक्झरी हॉटेल आहे. हे सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी जवळच आहे. रिलायन्सने गेल्या वर्षी ब्रिटनचा आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क ५९२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते.
रिलायन्सने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की
“रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेडने कोलंबस सेंटर कॉर्पोरेशनचे संपूर्ण जारी केलेले शेअर भांडवल सुमारे ९.८१ कोटी डॉलरच्या इक्विटी मोबदल्यासाठी विकत घेतले आहे.
हॉटेल मॅंडरिन ओरिएंटलमधील राहण्याच्या किंमती
- मॅंडरिन ओरिएंटल हे अमेरिकेतील ५-स्टार लक्झरी हॉटेल आहे.
- यामध्ये एका रात्रीची किंमत ५५ हजार रुपये ते १०.४० लाख रुपये आहे.
- यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांच्या दृश्यांपासून ते लक्झरी सुइट आहे.
- प्रेसिडेंशिअल सुइट, सुइट ५००० हे हॉटेलमध्ये उपलब्ध असतील.
अमेरिकेचे मँडरीन ओरिएंटल हे जगप्रसिद्ध हॉटेल आहे. एएए फाइव्ह डायमंड हॉटेल, फोर्ब्स फाइव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाइव्ह स्टार स्पा यांसह अनेक अलॉर्ड्स जिंकले आहेत.
मुकेश अंबानी हळूहळू हॉटेल इंडस्ट्रीकडे पाऊल उचलत आहेत. त्यांनी अमेरिकेचा प्रसिद्ध आणि आयकॉनिक कंट्री क्लब स्टोक पार्कही विकत घेतला आहे. ३०० एकरांवर बांधलेला हा क्लब अंबानींनी ५९२ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेडने याचे अधिग्रहण केले आहे.
स्टोक पार्क आतापर्यंत ब्रिटिश राजघराण्याच्या मालकीचे होते. अनेक वर्षांपासून ते विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे ४९ आलिशान खोल्या, २१ मेंशन आणि २८ पवेलियन आहेत. सर्वांकडे ५एए रेड स्टार रेटिंग आहे. हे पार्क बिट्रानेचा राजा जॉर्ज तिसरा याचे वास्तुविशारद जेम्स वॅट यांनी खाजगी जागा म्हणून बांधले होते. यामध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या मैफली झाल्या आहेत.