मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराने वर्ष २०२२ साठी आर्टिलरी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.भारतीय लष्कराच्या नाशिक आर्टिलरी सेंटरने जारी केलेल्या अधिसूचनेत स्वयंपाकी, फायरमॅन तसेच अन्य पदांचा यामध्ये समावेश आहे.अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांना १० वी आणि १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या फ्रेशर्स उमेदवारांचे वय १८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
किती वेतन?
- लोअर डिव्हिजन क्लर्क, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमॅन आणि स्वयंपाकी यांना १९,९०० रुपये ते ६३,२०० रुपये पर्यंत वेतन अदा केले जाईल.
- सामग्री दुरुस्तीकार, न्हावी, एमटीएस, घोडेवाला, धोबी, एमटीएस (माळी), एमटीएस (पहारेकरी ) यांना ८,०००- ५६,९०० रुपये वेतन मिळेल.
अधिक माहितीसाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वरून माहिती मिळवू शकता.