मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर, हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट इन्वेस्टमेंट अॅंड इन्शुरन्स, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट इन्वेस्टमेंट अॅंड इन्शुरन्स, इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर, पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट, एनआरआय वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर ट्रेड अॅंड फॉरेक्स, ट्रेड रेग्युलेशन-सिनियर मॅनेजर, प्रोडक्ट हेड प्रायवेट बॅंकिंग, ग्रुप सेल्स हेड वर्चुअल आरएम सेंटर, प्रायव्हेट बँकर- रेडियन्स प्रायव्हेट अशा एकूण १०५ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कृषी/ फलोत्पादन/ पशुसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ दुग्धशास्त्र/ मत्स्य विज्ञान/ मत्स्यपालन/ कृषी. विपणन आणि सहकार/ सहकार आणि बँकिंग/ कृषी-वनीकरण/ वनीकरण/ कृषी जैवतंत्रज्ञान/ अन्न विज्ञान/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ अन्न तंत्रज्ञान/ दुग्ध तंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ रेशीम शेती पदवी २) एमबीए/ पीजी डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस)/ पीजीडीएम-एबीएम ३) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.२ आणि १० साठी- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १० वर्षे अनुभव
- पद क्र.३,७,८ आणि ९ साठी- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ३ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) २ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १ वर्ष अनुभव
- पद क्र.६- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ५ वर्षे अनुभव
- पद क्र.११- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २४ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी आयसीटीच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.