मुक्तपीठ टीम
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आलीय. टीईटी परीक्षा प्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपात्र कसे केले जायचे पात्र?
- टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांचा ड्रायव्हर सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
- घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले होते.
- तुकाराम सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्सअपवर पाठवित होता.
- त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवित असल्याचे तपासात समोर आल आहे.
- सुपेचा चालक सुनील घोलप आणि अभिषेक सावरीकर यांच्यातील मोबाईल चॉटिंग पोलिसांच्या हाती आलं आहे.
- यामध्ये परिक्षेतील गैरव्यावहाराबाबत बोलणी झाली असल्याचं पोलिसांची माहिती आहे.
- सुनील घोलपचा पैशांच्या देवाण-घेवाणीत सहभाग दिसून आला असल्याचं तपासात समोर आले आहे.
पुणे पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई
- सध्या राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटकेचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
- पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात सुरंजित गुलाब पाटील आणि स्वप्नील तीरसिंग पाटील यांना अटक केली आहे.
- पुणे पोलिसांनी दोघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- तर यापूर्वी अटकेत असलेले सुनील खंडू घोलप आणि मनोज शिवाजी डोंगरे यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
- टीईटी परीक्षा प्रकरणी १३ आरोपींना अटक करण्यात आली असून चार कोटी ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.