मुक्तपीठ टीम
कोरोनाची तिसरी लाट धडका देत असतानाच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने कोरोनासाठीचं स्वस्त दरातील औषध आणण्याची तयारी सुरु केली आहे. या औषधामुळे जगातील गरिबांना मोठा फायदा होईल. ते आर्थिक कमकुवत देशांना पुरवले जाणार आहे.
स्वस्त औषधामुळे कोरोनाविरोधी लढ्याला बळ!
- लवकरच अमेरिकेची फार्मा कंपनी Pfizer आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांसाठी कोरोनाचे स्वस्त औषध आणणार आहे.
- फायझरचे हे स्वस्त औषध लॉन्च होण्यास विलंब होत आहे.
- त्यामुळे कोरोनासाठी अँटीव्हायरल औषध पॅक्लोविड सध्या पर्याय म्हणून दिले जात आहे.
- कोरोनावरील अँटीव्हायरल औषध मोलुपिरावीरच्या जेनेरिक आवृत्तीला भारतात नुकतीच मान्यता मिळाली आहे.
- आता फायझरचे नवं औषध आलं तर कोरोनाविरोधी लढ्याला मोठा फायदा मिळेल.
फायझरच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांसाठीच्या कोरोनाच्या स्वस्त औषधाचा मोठा फायदा मिळेल. हे स्वस्त औषध कंपनीकडून भारतालाही पुरवले जाणार आहे. त्यामुळे इथल्या गरीब लोकांनाही कोरोनासाठी स्वस्तात औषध मिळू शकेल. या औषधाच्या लाँचिंगमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे कोविड अँटीव्हायरल औषध पॅक्सलोविड सध्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांना दिले जात आहे. गेल्या आठवड्यात कोविड अँटीव्हायरल औषध मोलुपिरावीरच्या जेनेरिक आवृत्तीला भारतात मान्यता मिळाली. त्याच्या संपूर्ण कोर्ससाठी, एखाद्या व्यक्तीला सुमारे १४०० रुपये खर्च करावे लागतील, जे आत्तापर्यंतचे सर्वात परवडणारे औषध आहे.
Omicron आणि Pfizer चे Paxlovid औषध सर्व प्रकारांवर अतिशय प्रभावी असल्यामुळे अमेरिका, इंग्लंडसह काही देशांमध्ये आणीबाणीच्या वापरासाठी ते मंजूर करण्यात आले आहे.
फायझरचे पर्यायी औषधही
- युनायटेड नेशन्स-समर्थित मेडिसिन्स पेटंट पूलने नोव्हेंबरमध्ये Pfizer सोबत परवाना करारावर स्वाक्षरी केली आहे.
- Pfizer ला PaxLovid उप-परवाना देण्याची परवानगी दिली गेली आहे.
- हे औषध भारतासह जगभरातील ९५ कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पाठवले जाईल.
- ज्या स्वस्त औषधांवर काम केले जात आहे ते यावर्षी त्वरित उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे फायझर वेगळे स्वस्त औषध पुरवत आहे.