Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अष्टविनायक दर्शनासाठी पर्यटन विकास आराखडा, २४५ कोटींच्या योजनेचा आढावा

January 7, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Ashthavinayak mandir

मुक्तपीठ टीम

राज्य सरकारने आता कोट्यवधी भाविकांसाठी महत्वाचे असलेल्या अष्टविनायकांच्या स्थानांच्या विकासावर लक्ष दिले आहे. त्या आठ स्थानांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे. अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होत्या.

 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, नोडल एजन्सीमार्फत पर्यटनविषयक कामाला प्राधान्य देवून प्राथमिक स्वरुपातील जमीन, रस्ते, बसस्टॉप, वीज, पाण्याची टाकी, माहितीफलक, स्वागत कमानी, विद्युतीकरण या पायाभुत सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अष्टविनायक ट्रस्टला विश्वासात घेवून काम करावे. तसेच अष्टविनायक आराखडा निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, अष्टविनायकसंदर्भातील दोन प्रस्ताव नियोजित आहेत. यापैकी मुलभूत सुविधा देण्यासंदर्भात ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुसरा प्रस्ताव सुशोभिकरण, व्हीआयपी पास, उपहारगृह, यात्री निवास, वाहनतळ, भक्तनिवास याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी १३० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या आराखड्यासाठी ऐकूण २४५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. ‘प्रसाद’ योजनेंतर्गत अनेक कामे प्रस्तावित असून या कामाला एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. नवीन कामांचे प्रस्ताव आले आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

 

पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पर्यटन, नगरविकास, ग्रामविकास या विविध विभागाकडून प्रभावी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.’

 

पाहा व्हिडीओ:


Tags: lenyadriMahadmoregaonozarPaliranjhangaonsiddhatektheurअष्टविनायक
Previous Post

आता प्रत्येक जिल्ह्यात ‘पुस्तकांचे गाव’, आता शासन निर्णय जारी!

Next Post

अमेरिकन फार्मा कंपनी फायझर गरीबांसाठी कोरोनाचे स्वस्त औषध आणणार

Next Post
Pfizer to bring cheap corona medicine for poor

अमेरिकन फार्मा कंपनी फायझर गरीबांसाठी कोरोनाचे स्वस्त औषध आणणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!