मुक्तपीठ टीम
मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक अशी घटना कैद झाली आहे, जी तुम्हाला थक्क करेल! रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती वेगाने येणाऱ्या लोकलसमोर आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर पडलेला दिसत आहे, परंतु लोकल ट्रेनच्या मोटरमनने त्याच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीला त्याच्या काही मीटर आधी अंतरावर थांबून त्याचा जीव वाचवला.
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक मोटरमनच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्याचाही सन्मान रेल्वेकडून करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये काय आहे?
- रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला व्हिडीओ सकाळी ११ वाजून ४५ मिनिट वाजताचा आहे.
- व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरून निष्काळजीपणे चालताना दिसत आहे. यादरम्यान, वेगात लोकल ट्रेन त्याच्या जवळ येताच ती व्यक्ती अचानक रुळांवर पडली.
- व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पडून असताना त्या व्यक्तीने आपली मान रुळावर ठेवली आणि बाकीचे दोन रुळांच्या मध्ये नेले.
- मात्र, लोको पायलटने तो माणूस रुळावर पडलेला पाहून आपत्कालीन ब्रेक लावला.
- त्यामुळे रेल्वे रुळांवर तात्काळ थांबली आणि जीवघेणा अपघात टळला.
- व्हिडीओमध्ये रुळावर पडलेल्या व्यक्तीला पाहून तीन आरपीएफ जवानही धावताना दिसत आहेत.
रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला
रेल्वे मंत्रालयाने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मोटरमनने केले कौतुकास्पद काम: मुंबईच्या शिवडी स्टेशनवर, मोटरमनने एका व्यक्तीला रुळावर पडलेले पाहिले, त्याने तत्परतेने आणि समजूतदारपणाने आपत्कालीन ब्रेक लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. तुमचे आयुष्य अनमोल आहे, कोणीतरी तुमची घरी वाट पाहत आहे.
व्हिडीओला लाखो व्ह्यूज
- हा व्हिडीओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ६ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर सुमारे ९०० लोकांनी री-ट्विट केले आहे.
- हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘हे खरोखरच भयानक होण्यापासून वाचले. इमर्जन्सी ब्रेकनेही गाडी अचानक थांबत नाही, त्यासाठी अंतरही महत्त्वाचे असते. धन्य मोटरमन साहेब ज्यांनी योग्य वेळी समज दाखवली.