मुक्तपीठ टीम
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता समीर वानखेडे यांची मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांची बदली डीआरआयमध्ये झाली आहे.
डीआरआय विभागात पुन्हा जबाबदारी
- समीर वानखेडे पूर्वी डीआरआय विभागात होते.
- डीआरआय विभागातूनच त्यांना मुंबई एनसीबीमध्ये आणून झोनल डायरेक्टर करण्यात आले.
- आता त्याला पुन्हा डीआरआयकडे पाठवण्यात आले आहे.
कोण आहे समीर वानखेडे?
- समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे महसूल सेवेतील अधिकारी आहेत.
- ते मूळचे महाराष्ट्राचे आहेत.
- सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना प्रथम मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
- येथे त्यांनी जबरदस्त काम केले, त्यामुळे त्यांना नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले.
- ड्रग्सशी संबंधित प्रकरणे पकडण्यात ते माहीर असल्याचे बोलले जाते.
- दिल्लीनंतर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या जबाबदारीवर मुंबईला पाठवण्यात आले.
- येथे त्यांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर करण्यात आले.
- पदभार स्वीकारताच त्यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरू केला.
- यादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची चौकशी करण्यात आली.
- गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज आणि ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.
- परंतु अनेक प्रकरणात त्यांनी प्रसिद्धी जेवढी मिळवली तेवढ्या त्या प्रकरणांचा तपास न्यायालयात गेला नाही, असे आरोपही झाले.
मंत्री नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप
- ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते.
- ते सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत.
- समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबतही ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.
- यानंतर समीर वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला.