मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांच्यानंतर आता कल्याणमधील भाजपा आमदार गणपत गायकवाड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार गायकवाड हे पोलिसांवर संतापलेले दिसत आहे. तक्रार घेण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड पोलिसांवर संतापले होते.
व्हिडोओमध्ये काय दिसत आहे?
- भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा हा व्हिडीओ ३१ डिसेंबरचा आहे.
- कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचा दावा केला जातो आहे.
- या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली.
- भाजपा आमदार पोलिसांवर यावेळी चांगलेच संतापल्याचं चित्र व्हिडीओमध्ये पाहायला मिळालंय.
का संतापले गणपत गायकवाड
- योग्यप्रकारे पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला.
- तक्रार घेण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन भाजप आमदार संतापले होते.
- त्यांना बसून ठेवल्यानं त्यांनी राग व्यक्त केला असल्याचं व्हिडीओतील त्यांच्या संभाषणात ऐकू येत आहे.
- ‘बसू द्या ना, तक्रार घ्या ना.. ती आली असेल आधी, म्हणून तिची तक्रार आधी घेतली’, असा दावा पोलिसांनी केला होता.
त्यावर आमदार गायकवाड हे संतापले. - सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण पहिलं आलं ते मला बघायचंय, असा युक्तिवाद ते पोलिसांसमोर करु लागले.
- दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणजे काय? अधिकार आहेत माझे, असं म्हणत त्यांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला.
- पोलिस काय फक्त पैसे वसुलीसाठी आहेत का?असा प्रश्न ते विचारताना दिसत आहेत.