मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षी आर्यन खानसह क्रूझ पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंसह भाजपाविरोधात आरोपांची मालिका चालवली. यावर्षीच्या सुरुवातीलाच रविवार असूनही मलिकांच्या आरोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यांच्यावर भाजपाच्या मोहित कंबोज उर्फ भारतीयांकडून होणारे प्रत्यारोपही. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत प्रत्यारोप केले आहेत.
नवाब मलिकांचे नव्या वर्षातील नवे आरोप
- मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे कार्यकाळ वाढवून मागत नाहीत. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहेत, अशा बातम्या पेरल्या जात आहेत.
- कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? .
- आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- मात्र, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही.
- मागील वर्षी फसवणूक समोर आणली तशी या वर्षीही समोर आणणार आहे.”
चौकशीसाठीच्या एसआयटीचं पुढे काय झाले?
- मागील काही काळापासून हजारो करोडो रुपयांची वसुली सुरू आहे.
- प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्याचं पुढे काय झाले.
- आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला.
- मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले.
- त्यावेळी न्यायालयाला मी हे देखील विचारलं होत की मला एनसीबी जर काही चुकीचं काही करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का, तर त्याला हो असं उत्तर मिळालं होतं.
मोहित कंबोजांचेही मलिकांवर प्रत्यारोप
- भाजपा नेते भारतीय कंबोज यांनी ट्विट करत ”हा पाहा नवाब मलिकांचा फर्जिवाडा” असं म्हटलं आहे.
- कंबोज यांनी ट्वीट करत एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
- यामध्ये एक ई-मेल पाहायला मिळतोय.
- हा ई-मेल एका व्यक्तीने मुंबई पोलीस आयुक्तांना केल्याचा दावा करण्यात आला आहे.
- या मेलमध्ये त्या व्यक्तीने आपण ड्रग्ज केसमधील साक्षीदार असल्याचे म्हटलं आहे.
- या व्यक्तीने मुंबई पोलिसांना ईमेल द्वारे तक्रार करत आपल्या जीवाला धोका आहे, असं म्हटलं आहे.
कंबोजांनी ट्वीट केलेल्या मेलमध्ये काय?
- या स्क्रिनशॉटमध्ये अरबाज उकानी व्यक्तीच्या नावाने मुंबई पोलीस आयुक्तांना एक मेल पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
- या व्यक्तीने मेलमध्ये लिहीले आहे, ”मी एनसीबीच्या एक किंवा दोन प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून काम केले आहे.
- एनसीबीच्या कर्मचार्यांनी ड्रग पेडलर्स आणि अंमली पदार्थांवर कारवाई करून निःसंशयपणे उल्लेखनीय काम केले आहे.
- आर्यन खान प्रकरणानंतर एनसीपी नेते नवाब मलिक यांनी मला मीडियासमोर बोलण्यासाठी धमकी दिली आहे.
- मला एनसीबी विरुद्ध बोलण्यासाठी ३० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.
- तसेच एनसीबीविरुद्ध बोला अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली आहे. कृपया मला मदत करा.
- माझ्या जीवाला धोका आहे.