Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नारायण राणेंना शंभूराज देसाई बत्ताशावरचा पैलवान म्हणाले! म्हणजे काय?

January 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shambhuraj desai critisize Narayan rane

मुक्तपीठ टीम

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजप, त्यातही नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये टिका टिप्पणी सुरुच आहेत. राणे समर्थकांनी एक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल करत शिवसेनेला डिवचलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी धरून त्याला नारायण राणे फरपटत नेत असल्याचं यात दिसत आहे. हा वाघ मांजरीसारखा दाखवण्यात आला आहे. त्याला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गावाकडचा दाखला देत टोला हाणला आहे.

 

काय म्हणाले शंभुराज देसाई?

  • पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या. ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला लढत दिली असं सांगायचं हा केविलवाणा प्रयत्न आहे.
  • राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला हे शोभत नाही.
  • ही मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती.
  • नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत.
  • खूप मर्यादित मतदारांची निवडणूक होती.
  • सार्वत्रिक निवडणुकीत पुढं या, लोकमताचा कौल घ्यायला पुढं या, मग कोकणातली आणि सिंधुदुर्गमधली शिवसेना काय आहे हे नारायण राणे यांना कळेल.

राणेंचा मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांवरही निशाणा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या विजयानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. आता टार्गेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे, असंही ते म्हणाले. येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असं सूचक विधान त्यांनी केलं. तसंच काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी संस्था वाढवायला अक्कल लागते, डोकं लागतं, बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी कोपरखळी नारायण राणेंना लगावली होती. मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला अजित पवारांना लगावला.


Tags: ajit pawarcm uddhav thackerayMaharashtraNarayan raneshambhuraj desaisharad pawarअजित पवारनारायण राणेमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशरद पवार
Previous Post

भारतातील १.६२ कोटी कंटेंटवर फेसबुकची कारवाई!!

Next Post

आधी सुल्ली आता बुल्ली बाई…मुस्लिम महिलांमध्ये का संताप?

Next Post
BulliBai app

आधी सुल्ली आता बुल्ली बाई...मुस्लिम महिलांमध्ये का संताप?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!