मुक्तपीठ टीम
कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी नगरपालिकेचा माजी नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुण्यातून अटक केली आहे. तेलनाडे हा २ वर्षांपासून फरार होता. संजय तेलनाडे आणि त्याचा नगरसेवक भाऊ सुनिल या दोघांनी ‘एस.टी. सरकार’ या नावाने गुन्हेगारी टोळी बनवली होती. संजय तेलनाडेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे वेगवेगळे १७ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. संजय तेलने हा २०१९ पासून फरार होता. १ जानेवारी २०२२ ला पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्यांमध्ये हजर करण्यात आलं आहे.
२ वर्ष कुठे होता संजय तेलनाडे?
- २०१९ मध्ये फरार झाल्यापासून संजय तेलनाडे हा वेगवेगळ्या गावात फिरत होता.
- त्याने त्याचे अनेकदा मोबाईल नंबरही बदलले
- मोबाईल नंबर बदलून त्याने अनेकदा चकवा दिला.
- पोलिसांची सापळा रचून कारवाई
- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तेलनाडेच्या अटकेची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
- तेलनाडेच्या ‘एसटी सरकार गँग’मध्ये एक वकीलही होता.
- पोलिसांनी गँगमधील काही सदस्यांना बेड्या ठोकल्या, पण तेलनाडे बंधू फरार होते.
- त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
- संजय तेलनाडे नेपाळ, दुबईमध्ये असल्याचे बोलले जात होते. गेली अडीच वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता.
- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय तेलनाडे पुण्यातील आंबेगाव येथे येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.
- त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने पुण्यातल्या दत्तनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशिष कवठेकर आणि पोलिस हवालदार साठे यांच्या सहकार्याने आंबेगावमधल्या फ्लॅटवर छापा टाकून त्याला अटक केली.
- त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई आणि नातेवाईक होते.
- स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे, पोलिस हवालदार रणजीत पाटील, बालाजी पाटील, संजय इंगवले, अमर शिरढोणे, श्रीकांत मोहिते, रणजीत कांबळे, प्रशांत कांबळे, सूरज चव्हाण, उत्तम सडोलीकर, महादेव कुऱ्हाडे यांनी ही कारवाई केली.
संजय तेलनाडे हा माजी नगरसेवक राहिला आहे. त्यात एक टोळी बनवून तो दहशत निर्माण करत होता. राजकीय वरदहस्ताविषयी तेलनाडेची गुंडगिरी शक्य नाही, आता त्याला अटक केल्यानंतर त्याचा गॉडफादर कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय अशा अपप्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्या गॉडफादरवर कारवाई होणार का, हा ही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.