मुक्तपीठ टीम
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग करत या आमदारावर कारवाई करणार का? असा सवालही केलाय.
केशव उपाध्येंनी ट्विटरवर कवितेच्या माध्यमातून आमदारावर टीका करत महाविकास आघाडीतल्या नेत्यांना सवाल केला आहे.
काय आहे केशव उपाध्येंचं ट्विट?
उंचावून माना फुगवुन छाती
आपल्या आमदाराची पाहुन प्रगती
आवाज घुमवती, शिव्याही देती
साहेबांच्या डोळ्यापुढती
नवीन स्वप्ने फुलून येती
सत्तेची ही पाहुनि मस्ती,
जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी!
शिव्या देती, बघून घेतो म्हणती,
हे भविष्य आमच्या हाती
मी राष्ट्रवादी… pic.twitter.com/o411eZWvPv— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 1, 2022
उंचावून माना फुगवुन छाती
आपल्या आमदाराची पाहुन प्रगती
आवाज घुमवती, शिव्याही देती
साहेबांच्या डोळ्यापुढती
नवीन स्वप्ने फुलून येती
सत्तेची ही पाहुनि मस्ती,
जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी!
शिव्या देती, बघून घेतो म्हणती,
हे भविष्य आमच्या हाती
मी राष्ट्रवादी…
राज्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तरं दिसत आहेत. आमदार थेट पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि उद्धव ठाकरे या आमदारावर काही कारवाई करणार का?
नेमकं काय घडलं?
- तुमसर-मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री दहा वाजता तुमसरकडे जात होते.
- सोबत त्यांनी आमदारांच्या घरून ५० लाख रुपयांची रोकड घेतली होती.
- मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडवली.
- वळण असताना गाडी चालकांने इंडिकेटर का दिलं नाही, म्हणून दुचाकी वाहनाने पोलिसांनी कारचा पाठलाग केला.
- गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोघांना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळचे 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळवल्य़ाचा आरोप यासीम छवारेंनी केला.
- तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली.
- याप्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला.
- आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.
- आता स्वतः गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला.