मुक्तपीठ टीम
राज्यात आज ९ हजार १७० नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे, त्यापैकी ६ हजार १८० एकट्या मुंबई मनपाच्या हद्दीतील आहेत. पुणे मनपाच्या हद्दीतही ४०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी राज्यातील १ हजार ४४५ रुग्ण घरी परतले आहेत. आज राज्यात रिपोर्ट झालेले ओमायक्रॉनचे सहाही रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी १८० रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाची ठळक माहिती
- आज राज्यात ९,१७० नवीन रुग्णांचे निदान.
- आज १,४४५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.३५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ३२,२२५ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्गाची माहिती:
आज राज्यात ६ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
- पुणे ग्रामीण:- ३
- पिपरी चिचंवड मनपा- २
· पुणे मनपा-१
- आजपर्यंत राज्यात एकूण ४६० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
- यापैकी १८० रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३२७* |
२ | पिंपरी चिंचवड | २८ |
३ | पुणे ग्रामीण | २१ |
४ | पुणे मनपा | १३ |
५ | ठाणे मनपा | १२ |
६ | नवी मुंबई, पनवेल | प्रत्येकी ८ |
७ | कल्याण डोंबिवली | ७ |
८ | नागपूर आणि सातारा | प्रत्येकी ६ |
९ | उस्मानाबाद | ५ |
१० | वसई विरार | ४ |
११ | नांदेड | ३ |
१२ | औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर | प्रत्येकी २ |
१३ | लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर | प्रत्येकी १ |
एकूण | ४६० | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १८० रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३०७२८ | १८०४८८ | २११२१६ | ३०७२८ | १३३७९ | ४४१०७ | २७२ | १३५ | ४०७ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १८०६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १०२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ८०७७ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,७३१
- उ. महाराष्ट्र ०,१६२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०८९
- कोकण ०,०३७ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०७४
एकूण रुग्ण ९,१७०
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ९,१७० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ६१८०
- ठाणे १२९
- ठाणे मनपा ४४३
- नवी मुंबई मनपा ३४८
- कल्याण डोंबवली मनपा १७८
- उल्हासनगर मनपा ५२
- भिवंडी निजामपूर मनपा १३
- मीरा भाईंदर मनपा २६६
- पालघर ५१
- वसईविरार मनपा २००
- रायगड ८२
- पनवेल मनपा १३५
- ठाणे मंडळ एकूण ८०७७
- नाशिक ३२
- नाशिक मनपा ८१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर २४
- अहमदनगर मनपा ५
- धुळे १३
- धुळे मनपा १
- जळगाव ५
- जळगाव मनपा १
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण १६२
- पुणे ११७
- पुणे मनपा ४००
- पिंपरी चिंचवड मनपा १०३
- सोलापूर १०
- सोलापूर मनपा ३
- सातारा ५३
- पुणे मंडळ एकूण ६८६
- कोल्हापूर ९
- कोल्हापूर मनपा १०
- सांगली १९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७
- सिंधुदुर्ग १२
- रत्नागिरी २५
- कोल्हापूर मंडळ एकूण ८२
- औरंगाबाद २
- औरंगाबाद मनपा १३
- जालना ६
- हिंगोली २
- परभणी ३
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण ३१
- लातूर ११
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद २२
- बीड १२
- नांदेड १
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण ५८
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ३
- अमरावती मनपा ६
- यवतमाळ २
- बुलढाणा ०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण १२
- नागपूर ५
- नागपूर मनपा ४७
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ३
- गडचिरोली १
एकूण ९ हजार १७०
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.